आशियाई युवा ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार भारतीय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:32 AM2021-08-23T05:32:06+5:302021-08-23T05:32:17+5:30

भारतासाठी चार पदके निश्चीत, विश्वमित्र प्ले ऑफमध्ये पराभूत

Four Indians reach the semifinals of the Asian Youth Junior Boxing Championships | आशियाई युवा ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार भारतीय 

आशियाई युवा ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार भारतीय 

Next

नवी दिल्ली : विश्वमित्र चोंगथाम (५१  किलो) सह भारताच्या चार बॉक्सर्सनी रविवारी दुबईमध्ये एएसबीसी युवा आणि ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यासोबतच               भारताचे चार पदक निश्चित झाले आहेत. विश्व युवा चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेता विश्वमित्रने एकतर्फी लढतीत कजाकिस्तानच्या केंझे मुरातुल याला ५-० असे पराभूत केले. 

अभिमन्यू लॉरा (९२ किलो), दीपक (७५ किलो) आणि प्रीती (५७ किलो) यांनीही उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. 
मिडलवेट उपांत्यपूर्व फेरीत दीपकमध्ये इराकच्या धुर्गाम करीम याने सुरुवातीला दबदबा बनवला होता. तिसऱ्या फेरीत दीपकने करीमवर जोरदार पंच लगावले. त्यामुळे रेफ्रीने  हा सामना थांबवला. 

राष्ट्रीय चॅम्पियन हरियाणाच्या अभिमन्यूनेदेखील एकतर्फी लढतीत किर्गिस्तानच्या तेनिबेकोव संजारला पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा बनवली.  रेफ्रीने हा सामना            थांबवून अभिमन्यूला विजयी घोषित केले. 

n महिला गटात प्रीती हिने दुसऱ्या फेरीच्या लढतीत विजय मिळवला. तर दुसरीकडे आदित्य जंघू (८६ किलो) दुसऱ्या दिवशी पराभव स्वीकारणारा एकमेव खेळाडू ठरला. त्याला उपांत्यपूर्व फेरीत कजाकिस्तानच्या तेमरलान मुकातायेव याच्याकडून पराभव पत्करावा लागला.  
n तिसऱ्या दिवशी सहा भारतीय बॉक्सर आव्हान देतील. त्यात कृष पॉल (४६ किलो), आशीष (५४ किलो), अंशुल (५७ किलो), प्रीत मलिक(६३ किलो), भारत जून (८१ किलो), हे उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. तर गौरव सैनी (७० किलो) उपांत्य फेरीत आव्हानदेखील.  
n ही स्पर्धा सध्या दोन वर्षांनी होत आहे.

Web Title: Four Indians reach the semifinals of the Asian Youth Junior Boxing Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.