जोकोविचने ‘लाईन जज’ला मारला चेंडू; स्पर्धेतून ठरला अपात्र, राग काढणे आले अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:57 AM2020-09-08T00:57:35+5:302020-09-08T06:58:43+5:30

यूएस ओपन टेनिस

Djokovic hits the ball to the line judge | जोकोविचने ‘लाईन जज’ला मारला चेंडू; स्पर्धेतून ठरला अपात्र, राग काढणे आले अंगलट

जोकोविचने ‘लाईन जज’ला मारला चेंडू; स्पर्धेतून ठरला अपात्र, राग काढणे आले अंगलट

Next

न्यूयॉर्क : रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत सर्बियाचा नोवाक जोकोविच अमेरिकन ओपन टेनिस जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र रागाच्या भरात महिला अधिकाऱ्याला (लाईन जज) चेंडू मारल्याप्रकरणी त्याला अपात्र ठरवून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ग्रॅण्डस्लॅममधून अपात्र ठरवण्यात आलेला तो तिसरा खेळाडू ठरला.

अव्वल क्रमांकाचा नोवाक जोकोविच रविवारी स्पेनचा पाब्लो कारेनो बस्टा याच्याविरुद्ध उपउपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या सेटमध्ये ६-५ असा माघारला होता. त्याचवेळी रागाच्या भरात त्याने बेसलाईनच्या मागे चेंडू भिरकावला. हा चेंडू कोर्टवर उभ्या असलेल्या एका महिला अधिकाºयाच्या मानेला लागताच त्या खाली पडल्या.

हिलेला चेंडू लागल्याची चूक लक्षात आल्यावर जोकोविचने तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. संबंधित महिला अधिकाºयाला श्वास घेण्याचा त्रास होत होता. काही मिनिटांनी त्या तेथून निघून गेल्या. या घटनेनंतर रेफ्रीने पंचांशी १० मिनिटे चर्चा केली आणि जोकोविचचा प्रतिस्पर्धी बुस्टा याला विजयी घोषित करण्यात आले. घोषणेनंतर जोकोविचने त्याला शुभेच्छा दिल्या आणि कोर्टमधून बाहेर पडला. या घटनेमुळे जोकोविचचे १८ वे ग्रॅणडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. (वृत्तसंस्था)

याआधी १९९० साली जॉन मॉकेन्रोला आॅस्ट्रेलियन ओपन आणि २००० साली स्टफान कोबेके याला फ्रेंच ओपनमधून अपात्र करण्यात आले होते. मीडियाशी संवाद न साधता जोकोविचने स्वत:चा माफीनामा प्रसिद्ध केला. जोकोविचला स्पर्धेतून मिळणारे रँकिंग गुण आणि दोन लाख ५० हजार डॉलरची रक्कम दिली जाणार नाही. (वृत्तसंस्था)

‘या घटनेमुळे दु:खी आहे. लाईन जजबद्दल जाणून घेतले. त्या चांगल्या असल्याची माहिती मिळाली. मी हेतुपुरस्सर असे केले नाही. अपात्र ठरवणे हा माझ्यासाठी धडा आहे. याचा उपयोग चांगली व्यक्ती बनण्यासाठी करावा लागेल. स्पर्धेतील माझ्या वागणुकीसाठी आयोजक आणि चाहत्यांची माफी मागतो.’
-नोव्हाक जोकोविच

ओसाका, ज्वेरेव उपांत्यपूर्व फेरीत
च्न्यूयॉर्क : माजी विजेती जपानची नाओमी ओसाका आणि पाचव्या मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव यांनी सहज विजयासह अमेरिकन ओपन टेनिसची महिला आणि पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथी मानांकित ओसाकाने अर्नेट कोनटाविट हिचा ६-३, ६-४ ने पराभव केला. अन्य एका सामन्यात रॉजर्सने पेत्रा क्वितोवावर ७-६, ३-६, ७-६ ने खळबळजनक मात केली. अमेरिकेची जेनिफर बाडीरने जर्मनीची एंजेलिक कर्बरवर ६-१, ६-४ ने विजय नोंदवून प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. ज्वेरेवने स्पेनचा अलेक्झांडर डेविडोविच फोकिना याचा ६-२, ६-२, ६-१ ने पराभव केला. क्रोएशियाचा बोर्ना कोरिच याने आॅस्ट्रेलियाचा जौर्डन थॉम्पसन याचा ७-५, ६-१, ६-३ ने पराभव करीत पहिल्यांदा ग्रॅण्डस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Web Title: Djokovic hits the ball to the line judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस