दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 20:50 IST2025-12-02T20:44:40+5:302025-12-02T20:50:15+5:30
Indian Pickleball League : इथं जाणून घेऊयात पिकलबॉल लीगसंदर्भातील खास माहिती

दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
Delhi CM Rekha Gupta Unveils Indian Pickleball League Trophy 6 Team To Participate : दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये इंडियन पिकलबॉल लीग (IPVL) स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या हंगामाची मुहूर्त मेढ रोवली गेली. क्रीडा मंत्रालयासह इंडियन पिकलबॉल असोसिएशन (IPA) च्या मान्यतेसह आयोजित करण्यात आलेल्या पिकलबॉल लीग स्पर्धेत एकूण सहा फ्रँचायझी संघ जेतेपदासाठी लढताना दिसतील. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते के.डी. जाधव इंडोअर हॉलमध्ये या स्पर्धेतील विजेत्याला दिल्या जाणाऱ्या आकर्षक ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. इथं जाणून घेऊयात पिकलबॉल लीगसंदर्भातील खास माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई अन् चेन्नई फ्रँचायझीसह पहिल्या हंगामातील सहा संघ कोणते?
पिकलबॉल क्रीडा प्रकार हा टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल-टेनिस यांचा मिश्रित प्रकाराची अनुभूती देणारा आहे. या खेळात टेनिससारखा कोर्ट, बॅडमिंटनसारखे नियम आणि टेबल टेनिसमध्ये असणारे रॅकेट अर्थात पॅडल याचा वापर केला जातो. त्यामुळे भारतातील पहिल्या वहिल्या पिकलबॉल लीगमध्ये क्रीडा रसिकांना तीन वेगवेगळ्या खेळातील कौशल्य एकाच खेळाच्या माध्यमातून पाहण्याची भन्नाट अनुभूती घेता येईल. या स्पर्धेत बंगळुरू ब्लास्टर्स, हैदराबाद रॉयल्स, चेन्नई सुपर वॉरियर्स, मुंबई स्मॅशर्स, कॅपिटल वॉरियर्स आणि लखनऊ लेपर्ड्स हे ६ संघ सहभागी आहेत. सोमवारी १ डिसेंबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेचा समारोप ७ डिसेंबरला होणार आहे. यातील कोणता संघ पहिली वहिली ट्रॉफी उंचावत इतिहास रचणार ते पाहण्याजोगे असेल.
पहिल्या-वहिल्या पिकलबॉल लीगची घोषणा! सहा संघ भिडणार; प्रसिद्ध अभिनेत्री बनली मालकीण
शालेय अभ्यासक्रमातही पिकलबॉल खेळाला मिळेल स्थान
या स्पर्धेच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, भारतात खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडा संस्कृतीला एक नवी ओळख दिली आहे. पिकलबॉल या नव्याने लोकप्रिय होत असलेला खेळ आहे. भारतीय खेळाडू या खेळात विशेष छाप सोडतील. दिल्ली सरकार या क्रीडा प्रकाराचा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ही नव्या युगाची नवी सुरुवात
पिकलबॉल लीग स्पर्धा हा फक्त नव्या क्रीडा प्रकाराचा एक हंगाम नसून ही नव्या युगाची सुरुवात आहे. पिकलबॉलच्या प्रवासाचा हा क्षण खास आणि अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आयोजकांनी म्हटले आहे.