Defeat of Andy Murray | अँडी मरेला पराभवाचा धक्का
अँडी मरेला पराभवाचा धक्का

सिनसिनाटी : तीन वेळचा ग्रॅण्डस्लॅम विजेता अँडी मरे याने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुनरागमन केले. मात्र पहिल्या फेरीत रिचर्ड गास्केटविरोधात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. सात महिन्यात पहिला एकेरी सामना खेळणाऱ्या मरेला गास्केटविरोधात सरळ सेटमध्ये ४-६, ४-६ असा पराभव स्विकारावा लागला. दुखापतीमुळे तो जानेवारीपासून कोर्टपासून दूर होता. मरे याने आपला खेळ चांगला होता असे म्हटले आहे.


Web Title: Defeat of Andy Murray
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.