Corona Virus: 'तबलिगी जमात'वरून बबिता फोगाट अन् स्वरा भास्कर यांच्यात 'दंगल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 03:02 PM2020-04-18T15:02:58+5:302020-04-18T15:16:42+5:30

कोरोनाचा प्रसार करण्यात ही मागास जमातच पुढे का? बबिताचा प्रतिप्रश्न

Corona Virus : Babita Phogat Slammed By Swara Bhaskar svg   | Corona Virus: 'तबलिगी जमात'वरून बबिता फोगाट अन् स्वरा भास्कर यांच्यात 'दंगल'

Corona Virus: 'तबलिगी जमात'वरून बबिता फोगाट अन् स्वरा भास्कर यांच्यात 'दंगल'

Next

भारताची कुस्तीपटू बबिता फोगाटनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची बरीच चर्चा सुरू आहे. तिनं तबलिगी जमातवर टीका करताना देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढण्यास ते कारणीभूत असल्याचा आरोप केला. या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकाही होत आहे, तर अनेक जण तिच्या समर्थनातही उतरले आहेत. या मुद्द्यावरून आता बबिता फोगाट आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यात सोसल मीडियावर 'दंगल' रंगल्याचे पाहयला मिळत आहे.

''कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है। जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati,'' असं ट्विट तिनं 15 एप्रिलला केलं होतं. त्यानंतर तिला धमकीचे फोन, मॅसेज येऊ लागले. त्याला उत्तर देताना बबितानं 'तबलिगी जमात'च्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला. 

ती म्हणाली,''माझ्या पोस्टनंतर मला धमकी देणारे फोन, मॅसेज येत आहेत. त्यांनी मी सांगू इच्छिते की तुमच्या धमकीला घाबरणारी मी झायरा वसीम नाही. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. देशासाठी मी नेहमी लढत आली आहे आणि यापुढेही लढणार. माझ्या ट्विटमध्ये मी काहीच चुकीचं म्हटलेलं नाही आणि त्या विधानावर मी कायम आहे. तुम्हाला मी विचारते की तबलिगी जमात वाल्यांनी कोरोना संक्रमणला पसरवलं नसतं, तर आतापर्यंत हिंदुस्थानातून कोरोना व्हायरस नष्ट झाला असता. काही लोकांना सत्य कडू लागतं, पण मी सत्य बोलणं सोडणार नाही.''


तिच्या या विधानाचा स्वरा भास्करनं समाचार घेतला. ती म्हणाली,''बबिताजी जरा ही आकडेवारीही पाहा. क्या या भक्तांची कोरोना चाचणी झाली होती? कृपया याचवरही विधान करा. तबलिगी जमातच्या लोकांना कार्यक्रमासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलीच का? हा प्रश्न पण विचारा. आम्ही तुमचे फॅन आहोतच.''

त्यावर बबितानं तिला उलट प्रश्न केला. तिने विचारले,''135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला कोरोना संकटापासून वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दिल्लीतून लाखो कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशसाठी रवाना झाले आहेत. पण, कोरोनाचा प्रसार करण्यात ही मागास जमातच आघाडीवर का आहे?'' 

 

Web Title: Corona Virus : Babita Phogat Slammed By Swara Bhaskar svg  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.