ख्रिस्टियन एरिक्सन मृत्यूच्या दाढेतून परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 04:55 AM2021-06-15T04:55:28+5:302021-06-15T04:55:38+5:30

फुटबॉलपटूचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरचा अनुभव

Christian Erickson returned from the brink of death | ख्रिस्टियन एरिक्सन मृत्यूच्या दाढेतून परतला

ख्रिस्टियन एरिक्सन मृत्यूच्या दाढेतून परतला

Next

कोपनहेगन : ‘एक क्षण वाटले, एरिक्सन गेला. २९ वर्षांच्या ख्रिस्टियन एरिक्सनला मैदानावर हृदयविकाराचा जबर धक्का बसल्याने तो चक्क कोसळला. आम्ही त्याला गमावण्याच्या किती जवळ होतो हे सांगू शकणार नाही मात्र त्वरित उपचारांमुळे त्याला मृत्यूच्या दाढेतून अक्षरश: कसे खेचून आणले.’  हा थरार डेन्मार्क संघाचे डॉक्टर मॉर्टेन बोएसेन यांनी कथन केला आहे.
युरो चषकात फिनलँडविरुद्धच्या सामन्यात शनिवारी बेशुद्धावस्थेत मैदानावर कोसळल्यानंतर एरिक्सनचे प्राण वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. 
एरिक्सनची नाडीपरीक्षा केल्यानंतर फार कमी वेळ आहे, हे बोएसेन यांच्या ध्यानात आले. ‘सुरुवातीला तो श्वास घेत होता, त्यामुळे त्याची नाडी तपासता आली, पण नंतर त्याची प्रकृती ढासळत गेली. प्रत्येक खेळाडूला संकटाची चाहूल लागली होती. हृदयगती बंद पडल्यासारखे जाणवताच डेफिब्रिलेटर या यंत्राच्या सहायाने आम्ही त्याच्या छातीवर दाब देण्यास सुरुवात केली,’ असे 
बोएसेन म्हणाले.

 एरिक्सनची प्रकृती स्थिर
डेन्मार्कचा मधल्या फळीतील खेळाडूृ एरिक्सनची प्रकृती स्थिर असल्याचे डेन्मार्क फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. त्याच्यासोबत आम्ही सकाळीच बोललो, त्याने सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर असली तरी पुढील तपासण्यांसाठी त्याला रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे,’’ असे महासंघाने कळविले आहे.

सहकाऱ्यांनी डोळ्यात साठवले अश्रू
पुढील १० मिनिटे भीतीदायक होती. एरिक्सनवर विविध उपचार करण्यात येत होते. डेन्मार्कच्या खेळाडूंनी आपले अश्रू डोळ्यांतच साठवून ठेवले. त्यांनी एरिक्सनभोवती उभे राहत होणारे उपचार कुणालाही कळू दिले नाहीत. एरिक्सनची पत्नी सबरिनाला डेन्मार्कचा कर्णधार सिमॉन जाएर व गोलरक्षक कास्पेर श्मेइचेल यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शुद्धीवर आल्यानंतर एरिक्सनला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले, तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. ‘वैद्यकीय पथक व अन्य सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे एरिक्सनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणण्यात आम्हाला यश आले,’असेही बोएसेन यांनी सांगितले.

Web Title: Christian Erickson returned from the brink of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.