Breaking: India's Amit Pangal won silver medal | Breaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक
Breaking : भारताच्या अमित पांघलने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक

आशियाई पदक विजेत्या भारताच्या अमित पांघलने शनिवारी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अमितला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या एस. झोइरोव्हकडून पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले

अमितने 2018च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 2017 मध्ये कांस्य आणि 2019 मध्ये सुवर्णपदक जिंकले.


Web Title: Breaking: India's Amit Pangal won silver medal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.