मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 09:40 PM2021-06-18T21:40:27+5:302021-06-18T21:42:49+5:30

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

BJP workers were now taken back to TMC after purifying them by gangajal in West bengal  | मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश

मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश

Next

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पराभवानंतर नेत्यांची तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) घर वापसी सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीमध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत. टीएमसीमध्ये सामील होण्यासाठी गंगाजल शिंपडून भाजप कार्यकर्यांचे शुद्धीकरण केले जात आहे. (BJP workers were now taken back to TMC after purifying them by gangajal in West bengal)

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. भाजप कार्यकर्त्यांचे हे उपोषण जवळपास 4 तास चालले.

तब्बल चार तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. यानंतर संबंधित भागातील टीएमसी पंचायत प्रमुखांनी या सर्व कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना 'शुद्ध' केले. यानंतर त्यांना पुन्हा पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. यासाठीही भाजप कार्यकर्ते उत्साहात दिसत होते. विशेष म्हणजे या सर्व भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, की जोवर आम्हाला टीएमसीत प्रवेश मिळत नाही, तोवर आम्ही हे उपोषण सुरूच ठेऊ. महत्वाचे म्हणजे, भाजपतील केवळ छोटे कार्यकर्तेच नाही, तर मोठे कार्यकर्तेही याच रांगेत दिसत आहेत.

नंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष 

बीरभूम येथे काही दिवसांपूर्वीही टीएमसीमध्ये सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. पश्चिम बंगालमध्ये हा नवा ट्रेंडच सध्या सुरू झाला आहे.

असं आहे भाजपचं उत्तर?
या नव्या ट्रेंडवर बोलताना भाजपने आरोप केला आहे, की निवडणुकीनंतर जो हिंसाचार झाला, त्याला घाबरून भाजपतील हे कार्यकर्ते आता पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश करत आहेत. भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे, की आता भाजप कार्यकर्त्यांकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. कारण ज्या प्रकारचा हिंसाचार सुरू आहे, तो अभूतपूर्व आहे.
 
भाजपला धक्क्यावर धक्के -
भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मुकुल रॉय यांनी पुत्र शुभ्रांसू सोबत नुकता टीएमसीत प्रेवेश केला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत 11 जूनला पुन्हा टीएमसीत प्रवेश केला. 

धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप
 

Web Title: BJP workers were now taken back to TMC after purifying them by gangajal in West bengal 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.