शेतकऱ्याची पोर लै भारी; हिमा दासनं पटकावलं 11 दिवसांत तिसरं सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 09:23 AM2019-07-14T09:23:53+5:302019-07-14T09:43:43+5:30

भारताची सुपरस्टार धावपटून हिमा दासनं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली.

Athletics: Hima Das wins third gold in 11 days in Kladno Memorial | शेतकऱ्याची पोर लै भारी; हिमा दासनं पटकावलं 11 दिवसांत तिसरं सुवर्ण

शेतकऱ्याची पोर लै भारी; हिमा दासनं पटकावलं 11 दिवसांत तिसरं सुवर्ण

googlenewsNext

झेक प्रजासत्ताक : भारताची सुपरस्टार धावपटून हिमा दासनं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. हिमाचे हे  मागील 11 दिवसांतील तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमानं गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले.



पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमानं 23.65 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तिीनं कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेती 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली. त्यात रविवारी हिमानं 23.43 सेकंदाच्या वेळेसह आणखी एक सुवर्णपदक नावावर केले.  

क्लांदो स्पर्धेत भारताच्या विपिन कसाना ( 82.51 मीटर) , अभिषेक सिंग ( 77.32 मीटर) आणि दविंदर सिंग कांग ( 76.58 मीटर ) यांनी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अव्वल तिघांत स्थान पटकावले. पुरुषांच्याच गोळाफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमधारी तेजिंदर पाल सिंग थूर यांनं 20.36 मीटरसह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत व्ही के विस्मयानं वैयक्तिक कामगिरी उंचावताना 52.54 सेकंदाची वेळ नोंदवून A गटात अव्वल, तर सरीताबेन गायकवाडनं 53.37 सेकंदासह तिसरे स्थान पटकावले. 

दरम्यान,  किर्गीझस्तान  येथे पार पडलेल्या स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय विक्रमधारी एम श्रीशंकरने लांब उडीत 7.97 मीटरसह सुवर्णपदक जिंकले, तर अर्चनाने 100 मीटर ( 11.74 सेकंद), हर्ष कुमारने 400 मीटर ( 46.76 सेकंद), लिली दासने 1500 मीटर ( 4:19.05 सेकंद), साहिल सिलवालने भालाफेकीत ( 78.50 मीटर) आणि महिलांच्या 4बाय 100 मीटर रिले संघाने ( 45.81 सेकंद) सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.  





 

Web Title: Athletics: Hima Das wins third gold in 11 days in Kladno Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.