Asian Games 2018 : आशियाई सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:13 PM2018-08-31T15:13:23+5:302018-08-31T17:04:40+5:30

Asian Games 2018 : राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेतही भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मोठा धक्का बसला आहे. डायमंड लीगमध्ये नीरजचे पदक अवघ्या 0.03 मीटरच्या फरकाने कांस्यपदक हुकले.

Asian Games Gold Medallist Neeraj Chopra Misses Bronze by a Whisker in Diamond League Final | Asian Games 2018 : आशियाई सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राला धक्का

Asian Games 2018 : आशियाई सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राला धक्का

Next

ज्युरीचः राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेतही भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मोठा धक्का बसला आहे. डायमंड लीगमध्ये नीरजचे पदक अवघ्या 0.03 मीटरच्या फरकाने कांस्यपदक हुकले. आशियाई स्पर्धेतील विक्रमी कामगिरीनंतर नीरजकडून या स्पर्धेत खूप अपेक्षा होत्या. त्याला आशियाई स्पर्धेच्या आसपासही भालाफेक करता आले नाही.


20 वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.73 मीटर भालाफेक केली. मात्र, जर्मनीच्या थॉमस रोहलरने सहाव्या प्रयत्नात 85.76 मीटर भालाफेक करून कांस्यपदक नावावर केले. जर्मनीच्या आंद्रेस होफमन ( 91.44 मी.) व इस्टोनियाच्या ( 87.57 मी.) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.  

नीरजने आशियाई स्पर्धेत 88.06 मी. भालाफेक करून राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, डायमंड लीगमध्ये त्याला या कामगिरीच्या आसपासही फिरकण्यात अपयश आले. चेक प्रजासत्ताक येथे 8 व 9 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या काँटीनेंटल चषक स्पर्धेत नीरज सहभागी होणार आहे. त्याच्यासह या स्पर्धेत मोहम्मद अनास ( 400 मी.), जिन्सन जॉन्सन ( 800 मी.), अरपिंदर सिंग ( तिहेरी उडी), हिमा दास ( 400 मी.), पी. यू. चित्रा ( 1500 मी.)  आणि सुधा सिंग (3000 मी. स्टीपलचेस) हे भारतीय खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 
 

Web Title: Asian Games Gold Medallist Neeraj Chopra Misses Bronze by a Whisker in Diamond League Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.