अरुण भारद्वाज मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करणारे पहिले भारतीय अल्ट्रा-मॅरेथॉन धावपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:19 PM2021-02-09T16:19:41+5:302021-02-09T16:20:14+5:30

महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांत ५६० किलोमीटर अंतर १६६ तासांत धावून पार

Arun Bhardwaj becomes first Indian ultra-marathon runner to complete Mumbai-Nashik-Pune-Mumbai run | अरुण भारद्वाज मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करणारे पहिले भारतीय अल्ट्रा-मॅरेथॉन धावपटू

अरुण भारद्वाज मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करणारे पहिले भारतीय अल्ट्रा-मॅरेथॉन धावपटू

googlenewsNext

मुंबई : आंतरराष्ट्रीय मल्टि-डे रेसचे एकमेव भारतीय विजेते अरुण कुमार भारद्वाज यांनी अलीकडेच मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई रन पूर्ण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांना जोडणारा  ५६० किलोमीटरचा विनाथांबा प्रवास त्यांनी ३१ जानेवारी, २०२१ रोजी सुरू केला आणि १६६ तासांत पूर्ण केला.  चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video

गेल्या काही वर्षांत भारद्वाज यांनी दीर्घ अंतराची अनेक रनिंग टायटल्स जिंकली आहे. हा रन त्यांनी व्यायाम व धावण्याच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्दिष्टाने सुरू केला. लोकांना आपल्या कृतीद्वारे प्रेरणा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारद्वाज यांनी हा मार्ग निवडला, कारण, त्यांना धावण्याती आव्हानांना सामोरे जायला आवडते व हा मार्ग उष्मा आणि तीव्र चढणीचे घाट यांच्यामुळे आव्हानात्मक आहे. या मार्गातील १४ किलोमीटर लांबीचा कसारा घाट तीव्र चढणीचा आहे आणि हा घाट सर्वांत खडतर घाटांपैकी एक समजला जातो. ६.५ दिवसांच्या या रनमध्ये अरुण यांनी दिवसाला सरासरी ८० किलोमीटर अंतर कापले आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या रनमध्ये अनेक लोक त्यांना पाठिंबा म्हणून त्यांच्यासोबत काही किलोमीटर धावले.  India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

भारतातील पहिल्या काही आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त केलेल्या एण्ड्युरन्स रनर्सपैकी एक असलेले अरुण भारद्वाज या रनबद्दल म्हणाले, “भारतात रनिंगची संस्कृती गेल्या काही वर्षांपासून वेग घेऊ लागली आहे. आरोग्य व तंदुरुस्तीचा संदेश देण्यासोबतच अल्ट्रा-मॅरेथॉन रन्स आपल्या भविष्यकाळातील क्रीडापटूंना ऑलिम्पिक्समध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने तयारीमध्ये मदत करतील. मी धावतो, कारण, मला अधिकाधिक लोकांना रनिंगची प्रेरणा द्यायची आहे आणि माझ्यातील क्रीडापटूला कष्ट करण्यासाठी तसेच तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी नवीन आव्हाने हवी असतात. मला माझ्या मुलींसाठीही रोल मॉडेल व्हायचे आहे.”

दिल्लीचे रहिवासी असलेले अरुण यांना काही दिवसांत शेकडो किलोमीटर अंतर धावून पार करण्याची सवय आहे. लेहमार्गे कारगिल ते कन्याकुमारी हा ४१०० किलोमीटर्सचा रन त्यांचा सर्वांत आवडता आहे. हे अंतर कापण्यासाठी त्यांना दोन महिने लागले. गेल्या काही वर्षांत भारद्वाज यांनी अनेक दीर्घ पल्ल्याचे रन्स पूर्ण केले आहेत. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत केलेल्या ‘सिक्स-डे रेस’मध्ये त्यांनी दक्षिण आशियामधील विक्रम प्रस्थापित केला होता.

Web Title: Arun Bhardwaj becomes first Indian ultra-marathon runner to complete Mumbai-Nashik-Pune-Mumbai run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.