अमरावतीचा विजय भुयारे ठरला ‘विदर्भ बजरंग श्री’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 08:39 PM2020-01-29T20:39:49+5:302020-01-29T20:40:06+5:30

‘२०२० तिवसा कुमार’ राहुल मारबते ठरला.

Amravati's vijay bhuyare won 'Vidarbha Bajrang Sri' body building tittle | अमरावतीचा विजय भुयारे ठरला ‘विदर्भ बजरंग श्री’

अमरावतीचा विजय भुयारे ठरला ‘विदर्भ बजरंग श्री’

Next

तिवसा (अमरावती) : अमरावतीचाशरीरसौष्ठवपटू विजय भुयारे ‘विदर्भ बजरंग श्री’चा मानकरी ठरला आहे. माजी आमदार दिवंगत भय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ बॉडी बिल्डर असोसिएशन व स्थानिक ताराई फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय शरीरसौष्ठत्व स्पर्धा मंगळवारी पार पडली. विजयला बेल्ट, ट्रॉफी व २० हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आले.
      स्पर्धेत बेस्ट पोझर पारितोषिक अमिर सैफी (नागपूर) याने पटकावले. ‘२०२० तिवसा कुमार’ राहुल मारबते ठरला, तर ‘तिवसा कुमार ज्युनिअर’ म्हणून अजय हरणे याने बाजी मारली. तत्पूर्वी, राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख दिनेशनाना वानखडे यांचा आयोजन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी अण्णाजी दिवे, आयोजक नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी सभापती दिलीप काळबांडे, बाजार समिती सभापती संजय देशमुख, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, दीपक सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप राऊत, प्रदीप गौरखेडे, मधुकर भगत, अतुल देशमुख, हनुमंत ठाकरे, संतोष गहरवार, सत्यजित राठोड, भूषण यावले, योगेश वानखडे, स्वप्निल गंधे, सचिन ठाकरे, विशाल पवार, विशाल देशमुख, जीवन मैदानकर, अस्लम मंसुरी, सचिन गोरे,  धीरज ठाकरे, अविनाश पांडे, नंदकिशोर देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Amravati's vijay bhuyare won 'Vidarbha Bajrang Sri' body building tittle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.