आवक वाढल्यामुळे मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 04:19 AM2019-12-10T04:19:45+5:302019-12-10T06:00:42+5:30

ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांची मात्र निराशा

Vegetable prices in Mumbai fell due to increase in arrivals | आवक वाढल्यामुळे मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले

आवक वाढल्यामुळे मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले

googlenewsNext

नवी मुंबई : गुजरात, मध्य प्रदेशसह राज्यातील विविध भागांतून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. यामुळे बाजारभाव नियंत्रणामध्ये आले आहेत. भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पावसाळा लांबल्यामुळे आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दरही सातत्याने वाढू लागले होते. महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले होते. किरकोळ बाजारात अनेक भाज्यांचे दर प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा जास्त झाले होते. पावसाळा संपल्यापासून आवक वाढू लागली असून, दर कमी होत आहेत. सद्यस्थितीमध्ये नाशिक, पुणे, सातारा परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. गुजरातवरून कोबी व फ्लॉवर, मध्य प्रदेशमधून वाटाणा व राजस्थानवरून गाजराची आवक होत आहे. भाव कमी झाल्यामुळे ग्राहक खूश झाले आहेत. परंतु अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होऊ लागली आहे.

भाजी मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी शंकर पिंगळे यांनी सांगितले, मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांतून व परराज्यातूनही चांगली आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे दर नियंत्रणात असून, पुढील काही दिवस ग्राहकांना भाजीपाला स्वस्त मिळणार असल्याचेही स्पष्ट केले.

एपीएमसीमधील भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर

वस्तू            २ डिसेंबर      ९ डिसेंबर     किरकोळ
दुधी भोपळा २५ ते ३५      २० ते ३०     २४ ते ३०
फरसबी       ३० ते ४०      २५ ते ३५     ४० ते ५०
फ्लॉवर        २० ते २८       १६ ते २४     ४० ते ५०
गाजर          ३० ते ४०       २४ ते ३६    ५० ते ६०
गवार          ४० ते ६०        ३० ते ५०   ६० ते ७०

वस्तू        २ डिसेंबर          ९ डिसेंबर     किरकोळ
कोबी        २० ते २८           १४ ते २२       ३०
दोडका      २५ ते ३५          १६ ते २८       ५० ते ६०
टोमॅटो       १२ ते २६          १० ते २४         २० ते ३०
वाटाणा      ३० ते ५०         २० ते ३०          ४०
वांगी         २४ ते ३६         १६ ते २६        ५० ते ६०

Web Title: Vegetable prices in Mumbai fell due to increase in arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.