महावितरणच्या वाशी कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:40 AM2020-08-12T00:40:57+5:302020-08-12T00:41:05+5:30

वीजबिलाची हंडीही फोडली; मनसेच्या चार कार्यकर्त्यांना केली अटक

Vandalism in MSEDCL's Vashi office | महावितरणच्या वाशी कार्यालयात तोडफोड

महावितरणच्या वाशी कार्यालयात तोडफोड

Next

नवी मुंबई : वीजबिलवाढीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या वाशी कार्यालयात तोडफोड केली. वीजबिलांची हंडी फोडून प्रशासनाचा निषेध केला. या प्रकरणी चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईमध्ये लॉकडाऊनच्या काळात अंदाजे वीजबिले दिली आहेत. बिलांमधील चुकांची दुरुस्ती करावी. अन्यायकारक बिलवाढ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. नवी मुंबईमध्ये पक्षाच्या वतीने बिलांची होळीही करण्यात आली होती. यानंतरही काहीच उपाययोजना न केल्यामुळे संतापलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी वाशी सेक्टर १७ मधील अधीक्षक अभियंता कार्यालयात तोडफोड केली. कार्यालयात बैठक व्यवस्थेसाठी लावलेल्या काचेची आवरणे तोडून टाकली. वीजबिलवाढीची हंडी करून तीही कार्यालयात फोडून शासन व प्रशासनाचा निषेध केला.
या प्रकरणी पोलिसांनी पक्षाचे पदाधिकारी संदीप गलगुडे, अमोल इंगळे, आकाश पोतेकर, शरद दिघे या चौघांविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चारही पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. शहरवासीयांच्या हितासाठी हे आंदोलन केले असून, वीजबिलांचा प्रश्न सुटला नाही, तर अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.

नवी मुंबईसह राज्यात सर्वत्र वीजबिलांचा गोंधळ सुरू आहे. चुकीची व वाढीव रकमेची बिले नागरिकांना दिली आहेत. यापूर्वी बिलांची होळी करून प्रशासनाला इशारा दिला होता, परंतु त्यानंतरही काहीच कार्यवाही झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली.
- गजानन काळे, मनसे शहर अध्यक्ष, नवी मुंबई

Web Title: Vandalism in MSEDCL's Vashi office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.