महापेत अपघातामध्ये कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 04:07 PM2021-02-24T16:07:00+5:302021-02-24T16:07:39+5:30

Accident : ठाणे बेलापूर मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

The unfortunate death of a two-wheeler in a collision with a container in a major accident | महापेत अपघातामध्ये कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

महापेत अपघातामध्ये कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Next
ठळक मुद्दे राजेश गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. तिघेही कांजूरमार्ग येथे राहणारे आहेत.

नवी मुंबई - कंटेनरची धडक लागून दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. मृत व्यक्ती कांजूरमार्ग येथील असून दुचाकीवर दोन महिला सोबत असताना अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाने तिथून पळ काढला आहे.

ठाणे बेलापूर मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये राजेश गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. तिघेही कांजूरमार्ग येथे राहणारे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास दोन महिलांसह ते दुचाकीवरून चालले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक लागली. यामध्ये यामध्ये दुचाकीवरील तिघेही खाली पडले असता, गुप्ता हे कंटेनरच्या चाकाखाली चिरडले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनर घटनास्थळी सोडून तिघून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले.

 

Web Title: The unfortunate death of a two-wheeler in a collision with a container in a major accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.