सायन-पनवेल मार्गावर शनिवारी 'बर्निंग बस' चा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 05:36 AM2020-11-23T05:36:59+5:302020-11-23T05:37:28+5:30

सानपाडा येथील घटना : एक प्रवासी जखमी

Thunder of 'burning bus' on Sion-Panvel route on Saturday | सायन-पनवेल मार्गावर शनिवारी 'बर्निंग बस' चा थरार

सायन-पनवेल मार्गावर शनिवारी 'बर्निंग बस' चा थरार

Next

नवी मुंबई : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला आग लागल्याची घटना सानपाडा येथे घडली. कुरियरच्या कार्यालयासमोर बस थांबलेली असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून ३५ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

सायन-पनवेल मार्गावर शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आकांक्षा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सची बस मुंबईच्या दिशेने चालली होती. सानपाडा येथे बस थांबली असता बसमध्ये आग लागली. बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र आगीचा भडका उडाल्याने प्रवासी मुकेश क्षीरसागर हे भाजले गेल्याने जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.  आगीची माहिती मिळताच सानपाडा पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र बसमधील प्रवाशांकडे असलेल्या सॅनिटायझरमुळे आग भडकल्याची शक्यता आहे. याप्रकरणी बसचालक व मालक यांच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Thunder of 'burning bus' on Sion-Panvel route on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.