नवी मुंबईत तीस कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:06 AM2020-06-06T00:06:25+5:302020-06-06T00:06:58+5:30

सुधारित नियमावलीमुळे झोन झाले कमी : तुर्भेमध्ये सर्वाधिक १२ ठिकाणांचा समावेश

Thirty containment zones in Navi Mumbai | नवी मुंबईत तीस कंटेनमेंट झोन

नवी मुंबईत तीस कंटेनमेंट झोन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शासनाच्या सुधारित नियमावलीमुळे नवी मुंबईमधील कंटेनमेंट झोनची संख्या १११ वरून ३० वर आली आहे. सर्वाधिक ११ कंटेनमेंट झोन तुर्भे परिसरात आहेत. नियम शिथिल झाल्यामुळे अनेक ठिकाणी बंद केलेले रोड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.


नवी मुंबईमध्ये १३ मार्चला पहिला रुग्ण सापडला. एक रुग्ण सापडल्यानंतरही शहरात खळबळ उडाली होती. महानगरपालिका प्रशासनाने रुग्ण सापडलेल्या परिसरात जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. संपर्का$तील सर्वांना क्वारंटाइन केले व ५०० मीटर परिसर सील केला. यानंतर रुग्ण सापडला की शासन नियमानुसार ती इमारत सील करून ५०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. सानपाडामध्ये रुग्ण सापडल्यानंतर रेल्वे स्टेशनचा भुयारी मार्गही बंद करण्यात आला होता. १० ते १५ इमारती असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये एखादा रुग्ण सापडल्यानंतर सर्व इमारती सील केल्या जात होत्या. नवी मुंबईमधील कंटेनमेंट झोनची संख्या तब्बल १११ झाली होती.


सुधारित नियमावलीप्रमाणे सद्य:स्थितीमध्ये फक्त ३० ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. यामध्ये तुर्भेमध्ये ११, नेरूळमध्ये ६, ऐरोलीत ४, बेलापूर व घणसोलीत २, दिघामध्ये ३ तर वाशीसह कोपरखैरणेत प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे.


नवीन नियमाप्रमाणे एखाद्या इमारतीमध्ये रुग्ण सापडला तरी तेवढीच सदनिका सील केली जाते. त्या सोसायटीमधील इतर इमारती सील केल्या जात नाहीत. एखाद्या दुकानामध्ये रुग्ण सापडला तर त्याच्या डाव्या व उजव्या बाजूचे एक दुकान सील केले जात आहे. झोपडपट्टी व बैठ्या चाळींतही रुग्ण सापडलेले घरच सील केले जाते. एकापेक्षा जास्त रुग्ण आढळले असल्यास आरोग्य विभाग गांभीर्य लक्षात घेऊन परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करीत आहे. सुधारित नियमावलीमुळे अनेक ठिकाणी बंद केलेले रोड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये विनाकारण निर्माण होणारी भीती बंद झाली आहे.

शहरातील विभागनिहाय कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे

बेलापूर विभाग
च्करावे गाव
च्दिवाळे गाव सेक्टर १४
वाशी विभाग
च्सेक्टर १०, सेक्टर ११, जुहूगाव
कोपरखैरणे विभाग
च्साईदीप सोसायटी सेक्टर १९
घणसोली विभाग
च्चिंचआळी
च्सेक्टर १ घणसोली
नेरूळ विभाग
च्शिरवणे गाव
च्सेक्टर २३ जुईनगर
जुईपाडा गाव
च्गांधीनगर एमआयडीसी
च्शिवाजीनगर
च्सेक्टर १४ प्लॉट २५३ कुकशेत
च्सारसोळे सेक्टर ६
ऐरोली विभाग
च्आदर्श चाळ सेक्टर १
समता नगर चिंचपाडा
च्पंचशील नगर,
कातकरी पाडा
च्ऐरोली गाव
तुर्भे विभाग
च्सेक्टर २१ तुर्भे
च्इंदिरानगर
च्सेक्टर २२ तुर्भे
च्हनुमान नगर
च्सेक्टर ४ ए सानपाडा
च्ड्रम गल्ली तुर्भे स्टोअर
च्सेक्टर २० तुर्भे
च्सेक्टर १८ भरत शत्रुघ्न पॉवर
च्आंबेडकर नगर, इंदिरा नगर
च्अष्टविनायक चाळ पावणे
दिघा विभाग
च्नामदेव वाडी
च्बिंधू माधव नगर, संजय गांधी नगर
च्ईश्वर नगर, इलठाणपाडा

Web Title: Thirty containment zones in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.