स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीसाठी विशेष गीत; सीवूडमध्ये फ्लॅश मॉबचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:34 AM2020-01-16T00:34:39+5:302020-01-16T00:34:48+5:30

या वेळी महापालिकेने ठेवलेल्या प्लास्टिक प्रतिबंधाच्या सेल्फी पॉइंटसोबत वैयक्तिक व कुटुंबासमवेत छायाचित्रे काढली.

A special song for the Clean Survey Tribe; Organizing Flash Mobs in Seaweed | स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीसाठी विशेष गीत; सीवूडमध्ये फ्लॅश मॉबचे आयोजन

स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीसाठी विशेष गीत; सीवूडमध्ये फ्लॅश मॉबचे आयोजन

googlenewsNext

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अभियान घराघरांमध्ये पोहोचविण्यासाठी महापालिकेने स्वच्छतागीत तयार करून घेतले आहे. या गीतासही शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीवूडमध्ये प्लॅश मॉबच्या माध्यमातूनही महापालिकेने जनजागृती केली.

स्वच्छता अभियानासाठी महापालिकेने धनश्री देसाई यांच्याकडून विशेष गीत तयार करून घेतले आहे. ‘सश्य श्यामला धरा नवी मुंबईची’ हे गीत रोहित शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे. रविवारी पॅशन स्टुडिओच्या सुषमा सिंग यांच्या नृत्य समूहाने रविवारी सीवूडमधील मॉलमध्ये फ्लॅश मॉब सादर केला. या वेळी उपस्थितांनीही उत्तम प्रसिाद दिला.

या वेळी महापालिकेने ठेवलेल्या प्लास्टिक प्रतिबंधाच्या सेल्फी पॉइंटसोबत वैयक्तिक व कुटुंबासमवेत छायाचित्रे काढली. नागरिकांनी स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभागी होणार असल्याचे मत व्यक्त केले. आम्ही कमीत कमी कचरा करू, केलेला कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाही. कोणी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना समजावून सांगू, अशा प्रतिक्रियाही या वेळी दिल्या.
स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, यामुळे स्वच्छता अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. सीवूडप्रमाणे शहरात इतर ठिकाणीही फ्लॅश मॉब आयोजित केला जाणार आहे.

Web Title: A special song for the Clean Survey Tribe; Organizing Flash Mobs in Seaweed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.