इंग्रजी बोला; पण मराठी भाषेला सोडू नका- कवी अरुण म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:38 PM2020-02-26T23:38:58+5:302020-02-26T23:39:04+5:30

पनवेलमध्ये मराठी भाषा गौरवदिनाचे आयोजन

Speak english But don't give up on Marathi language - poet Arun Mhatre | इंग्रजी बोला; पण मराठी भाषेला सोडू नका- कवी अरुण म्हात्रे

इंग्रजी बोला; पण मराठी भाषेला सोडू नका- कवी अरुण म्हात्रे

Next

पनवेल : बोली भाषांत मराठी भाषेला जगात मानाचे स्थान आहे. मराठी भाषक व्यक्तींनी जगावर प्रभुत्व गाजवले, इंग्रजी बोला; पण मराठी सोडू नका. मराठी ही हृदयाची भाषा आहे. ती माणसाला मोठेच बनवते, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी अरुण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल मराठी विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या वतीने बुधवारी महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन समारंभ आयोजित केला होता.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर होते, तर प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री नयन पवार, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, अ‍ॅड. चंद्रकांत मढवी, कवियत्री जोत्स्ना रजपूत, स्मिता गांधी, मंदाकिनी हांडे, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. सोनू लांडे, प्रा. प्रवीण गायकर आदी उपस्थित होते. मराठी भाषादिन हा अभिमान जागवण्याचा दिवस आहे. मराठी साहित्यात वि. वा. शिरवाडकर यांचे नाव अजरामर आहे, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्या सूचनेवरून मराठी भाषादिन साजरा करण्याची सुरुवात झाल्याची माहिती कवी म्हात्रे यांनी या वेळी दिली. अक्षराच्या दुनियेत आजच्या तरुण पिढीने जर झोकून दिले तर त्यांची भविष्यातील स्वप्न पूर्ण होतील. पुस्तके वाचली पाहिजेत. उत्तम भाषा ही संवाद घडू शकते, त्यामुळे बारावीपर्यंत मातृभाषा सक्तीचे करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी, जीवन जगण्यासाठी कविता, साहित्य स्फूर्ती देतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कवींचे साहित्य प्रेरीत करते. अनेकांना जीवनात अडचणी येतात, तेव्हा कविता प्रेरणादायी ठरतात. समाजात चांगल्या साहित्याची निर्मिती होत असताना तरुणांनीही साहित्य लिहिले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण गायकर यांनी केले. उपस्थितांचे आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनू लांडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर यांनी केले.

Web Title: Speak english But don't give up on Marathi language - poet Arun Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.