प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:33 AM2020-01-18T00:33:11+5:302020-01-18T00:33:25+5:30

सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्याही सूचना

Solve the project victims' homes; Directions by Eknath Shinde | प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next

नवी मुंबई : नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा. भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन पुनर्विकासाचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले आहेत.
सिडकोच्या विविध प्रकल्पांचा नगरविकासमंत्र्यांनी गुरुवारी आढावा घेतला. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ही घरे नियमित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यामधील अनेक घरे जुनी आहेत. या घरांविषयी प्रकल्पग्रस्तांचे समाधान होईल, अशाप्रकारचे धोरण आखण्यात यावे. घरांचे धोरण आखण्यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथम लोकांचा विश्वास संपादन करण्यात यावा. गैरसमज दूर करा, सर्वेक्षण केल्याशिवाय निश्चित लाभ देणारी योजना तयार करता येणार नाही हे त्यांना पटवून द्या. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि सूचनांचा विचार करून योजनेत आवश्यक ते बदल करण्याची लवचिकता ठेवा, असेही नगरविकासमंत्र्यांनी या बैठकीत सूचित केले. प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पाणीपुरवठा योजनांना गती द्या
सिडकोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प सुरू केले आहेत. परवडणाºया घरांचे अनेक प्रश्न सिडको कार्यक्षेत्रामध्ये सुरू आहेत. यामुळे भविष्यात सिडको क्षेत्रातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही या बैठकीत नगरविकासमंत्र्यांनी दिल्या. सिडकोच्या पाणीपुरवठ्याच्या ज्या प्रस्तावित योजना आहेत, त्यांना गती देण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व पावले उचलेल, अशी ग्वाहीही या वेळी प्रशासनास देण्यात आली.

Web Title: Solve the project victims' homes; Directions by Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.