वीजबचतीसाठी पनवेलमधील शाळेत सौरऊर्जेचा अवलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:14 AM2019-11-17T00:14:15+5:302019-11-17T00:14:19+5:30

पाच लाख रुपयांची वीजबचत; इतर शाळांसमोर ठेवला आदर्श

Solar Power Deployment in Panvel School for Power Conservation | वीजबचतीसाठी पनवेलमधील शाळेत सौरऊर्जेचा अवलंब

वीजबचतीसाठी पनवेलमधील शाळेत सौरऊर्जेचा अवलंब

Next

कळंबोली : नवीन पनवेल येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या बांठिया हायस्कूल विजेसाठी आता स्वंयपूर्ण झाले आहे. महावितरणच्या विजेवर अवलंबून न राहता, हायस्कूल व्यवस्थापनाने सौरऊर्जेचा अवलंब केला आहे. सध्या संपूर्ण शाळेचा कारभार या सौरऊर्जेवर सुरू आहे. त्यामुळे शाळेची विद्युत देयकापोटी महिन्याची पाच लाख रुपयांची बचत होत आहे. वीजबचतीबाबत या शाळेने तालुक्यातील इतर शाळांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

नवीन पनवेल आणि आजूबाजूच्या अनेक गावांतील विद्यार्थी के. आ. बांठिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्याकरिता येतात. या शाळेत पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर रात्रशाळा आणि यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे केंद्रसुद्धा या इमारतीत सुरू आहे.

सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिकतात. मराठी आणि इंग्रजी माध्यमाबरोबरच सुसज्ज ग्रथांलय, प्रयोगशाळा, संगणककक्ष या ठिकाणी आहे. अनुभवी शिक्षक या संकुलात आहेत. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकण्यासाठी त्याला दर्जेदार शिक्षण येथे दिले जाते. अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना माहिती आणि तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान दिले जाते. सातत्याने वेगळेपण जपणाऱ्या या शाळेने सोलार यंत्रणा बसवली आहे. शाळेच्या छतावर सोलारचे ९५ पॅनल बसविण्यात आले आहेत. त्याबरोबर बॅटरी, इन्व्हर्टर आणि इतर साहित्याचा त्यामध्ये सामावेश आहे. त्यातून दररोज २२ किलो व्हॅट वीजनिर्मिती होत आहे. नर्सरी ते बारावीपर्यंत ही शाळा आहे. संगणककक्ष, प्रयोगशाळा, शिक्षककक्ष, मुख्याध्यापक दालन, शौचालय व कार्यालयाचा समावेश आहे. या ठिकाणी महिन्याला जवळपास ५७५ किलो व्हॅट विजेची गरज आहे. ती गरज सौरऊर्जेतून पूर्ण होत आहे. शाळेत बसविण्यात आलेल्या सोलार सिस्टीममधून दररोज २२ किलो व्हॅट इतकी वीज निर्माण होत आहे. त्यापैकी दोन केव्ही व्हॅट वीज शिल्लक राहते. ती महावितरण कंपनीला शाळेकडून दिली जाते. त्याचबरोबर साप्ताहिक व इतर सुट्टीच्या काळातही विजेची बचत होते. बचत होणारी ही वीज महावितरणकडे वर्ग केली जात आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता विजेची गरज आहे. त्याकरिता आम्ही सोलार यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात आली आहे. यामुळे अखंडित वीजपुरवठा होत आहे, तसेच या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा साधनाचा वापर कसा करायचा, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध झाल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक बी. एस. माळी यांनी या कामी पुढाकार घेतला. यातून महिन्याला लाखो रुपये विजेची बचत होत आहे.

शाळेची इमारत मोठी आहे. या ठिकाणी वर्गखोल्याही जास्त आहेत. फॅन, ट्यूब त्याचबरोबर संगणक कक्ष, प्रयोगशाळेला मोठ्या प्रमाणात वीज लागते. त्यासाठी लाखो रुपये वीजबिल भरावे लागत होते. त्याकरिता पैसे आणायचे कुठून? असा आम्हाला प्रश्न पडत असतो. त्यामुळे या ठिकाणी सोलार सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा झाला. तसेच अपारंपरिक अर्जाचा जास्त वापर कसा केला पाहिजे, हे विद्यार्थ्यांना या माध्यमातून पटवून देता येत आहे.
- बी. एस. माळी,
मुख्याध्यापक, के. आ. बांठिया हायस्कूल नवीन पनवेल

Web Title: Solar Power Deployment in Panvel School for Power Conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.