शिवसैनिकांना नवी मुंबईबाहेरील मतदारसंघाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:28 PM2019-10-12T23:28:45+5:302019-10-12T23:29:24+5:30

ऐरोलीसह बेलापूरमध्ये कमी उपस्थिती । भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याविषयी संभ्रम

Shiv Sena workers got responsibility for constituency outside Navi Mumbai | शिवसैनिकांना नवी मुंबईबाहेरील मतदारसंघाची जबाबदारी

शिवसैनिकांना नवी मुंबईबाहेरील मतदारसंघाची जबाबदारी

Next

नवी मुंबई : युतीच्या जागावाटपामध्ये ऐरोली व बेलापूर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप कायम आहे. प्रचार करण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आहे. दोन्ही मतदारसंघामधील प्रचारामध्ये शिवसैनिकांचा उत्साह कमी दिसत आहे. बहुतांश पदाधिकाऱ्यांना मुंब्रा व इतर मतदारसंघाची जबाबदारी दिल्यामुळे पुढील एक आठवडा महत्त्वाचे पदाधिकारी शहराबाहेर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


२५ वर्षांपूर्वी नवी मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिला महापौर शिवसेनेचाच झाला. १९८५ पासून हा बेलापूर मतदार शिवसेनेकडे होता. येथून १९९० पासून सलग तीन वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. २००९ मध्ये हा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात आला व ऐरोली मतदारसंघ शिवसेनेने स्वत:कडे घेतला. या वेळी दोन्ही मतदारसंघ भाजपला देण्यात आले आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जागावाटप जाहीर झाल्यानंतर दोन दिवस वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बंडखोरी करण्याचा इशारा दिला. बेलापूर मतदारसंघामधून शहरप्रमुख विजय माने यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला आहे. ऐरोलीमध्ये उपनेते विजय नाहटा यांना निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात आला; परंतु त्यांनी नकार दिला. शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही बंडखोरांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी ज्यांनी यापूर्वी शिवसेना सोडली त्यांना धडा शिकविण्याचे आवाहन केले. यामुळे ऐरोली मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारामध्ये शिवसेना पदाधिकारी दिसेनासे झाले आहेत.


भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते; परंतु हा पक्षाचा अधिकृत मेळावा नसल्याचे मेसेज शिवसेनेच्याच काही पदाधिकाºयांनी समाजमाध्यमांवर पाठविले, यामुळे निर्माण झालेला वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. यामुळे दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शिवसेना पदाधिकाºयांची उपस्थिती रोडावली आहे. पदाधिकाºयांमधील नाराजीमुळे पक्षाच्या नेत्यांनी नवी मुंबईमधील प्रमुख पदाधिकाºयांवर नवी मुंबईबाहेरील मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.


मुंब्रा व इतर मतदारसंघामध्ये पदाधिकाºयांची नियुक्ती केली आहे. रविवारपासून नवीन जबाबदारीवर शिवसैनिक जाणार असल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी दिली. मुंबईमधील मतदारसंघाचीही जबाबदारी काही पदाधिकाºयांवर दिली आहे. नवी मुंबईत भाजपचा प्रचार करण्यापेक्षा इतर मतदारसंघामध्ये जाऊन शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणे चांगले, असेही मतही काही पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

कुठे जाणार शिवसैनिक
१नवी मुंबईमधील काही शिवसेना पदाधिकाºयांवर मुंब्रा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. मुंब्रामध्ये अनेक पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहेत. काही शिवसैनिक ठाणेमध्ये जाण्याची शक्यताही आहे. मुंबईमध्येही काही शिवसेना पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहेत.
प्रचाराविषयी दोन मतप्रवाह
२ऐरोली व बेलापूर मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना भाजप उमेदवारासोबत शिवसेना पदाधिकारीही उपस्थित होते. वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाºयांची एक बैठकही झाली होती. यामध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरले आहे. अनेक शिवसेना पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागीही होत आहेत; परंतु त्यामध्ये अद्याप फारसा उत्साह आलेला नाही.

Web Title: Shiv Sena workers got responsibility for constituency outside Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.