विनयभंगप्रकरणी कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित; महाविद्यालयाबाहेर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 11:48 PM2019-08-23T23:48:31+5:302019-08-23T23:48:51+5:30

कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत गुरुवारी एक विद्याथिंर्नी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेज बाहेरील एका तरुणाने तिच्यासमोर अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला.

Principal suspended for breach of breach; Movement outside the college | विनयभंगप्रकरणी कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित; महाविद्यालयाबाहेर आंदोलन

विनयभंगप्रकरणी कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित; महाविद्यालयाबाहेर आंदोलन

Next

मुंबई : महाविद्यालयांत असतानाच तरुणीशी अश्लील चाळे करून , विनयभंग केल्यावर खुद्द प्राचायार्नीच तिला तब्ब्ल ३ तास वर्गखोलीत डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार कामोठे येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत घडला. पीडित विद्यार्थिनींची तक्रार गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी संतप्त विद्यार्थ्यांच्या जमावाने महाविद्यालयांत जोरदार आंदोलन करून महाविद्यालयीन प्रशासनाला प्राचार्यांची पदावरून हाकलपट्टी करण्याची मागणी केली. दरम्यान विद्यार्थी संघटनांनीही यामध्ये उडी घेतल्याने अखेर कॉलेज प्रशासनाने प्राचार्यांचे निलंबन केले.

कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत गुरुवारी एक विद्याथिंर्नी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेज बाहेरील एका तरुणाने तिच्यासमोर अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनींने तातडीने हा प्रकार महाविद्यालयांचे प्राचार्य संतोष नारायाण खेडेकर यांना सांगितला. परंतु प्राचार्यानी तरुणावर कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्यासाठी व पीडीत मुलीने गुन्हा दाखल करू नये यासाठी तिला एका वर्गामध्ये डांबून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दोषी तरुणावर कारवाई करण्याऐवजी विद्याथिंर्नीला डांबून ठेवल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत गोंधळ घातला. अखेर महाविद्यालय प्रशासनाकडून विद्याथिंर्नीच्या पालकांना व पोलिसांना कळवण्यात आले. मात्र त्यानंतरही तरुणावर कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले.

दरम्यान मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अ‍ॅड वैभव थोरात यांनी हा प्रकार कळताच गुन्हेगाराला पाठिशी घालणाऱ्या प्राचार्याना तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांचा संताप व विद्यार्थी संघटनांनी घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळे अखेर कॉलेज विश्वस्तांकडून प्राचार्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

यापुढेही महाविद्यालयांत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक यंत्रणा रुजू ठेवण्याची मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनीही पोलीस गस्त सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे
- अ‍ॅड. वैभव थोरात,
सिनेट सदस्य,
मुंबई विद्यापीठ

Web Title: Principal suspended for breach of breach; Movement outside the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.