‘डफली बजाओ’ आंदोलन; निर्बंध हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:37 PM2020-08-12T23:37:20+5:302020-08-12T23:37:24+5:30

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

‘Play Duffy’ movement; Demand for removal of restrictions | ‘डफली बजाओ’ आंदोलन; निर्बंध हटविण्याची मागणी

‘डफली बजाओ’ आंदोलन; निर्बंध हटविण्याची मागणी

Next

नवीन पनवेल : बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळ पनवेल बस डेपोमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जर देशातील लॉकडाऊन शासनाने मागे घेतले नाही आणि सर्वसामान्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी जर बस सेवा सुरू केली नाही व सर्वसामान्य गरीब जनतेची अशीच पिळवणूक होत राहिली, तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात पनवेल तालुका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष दीपक कांबळे, पनवेल तालुका सरचिटणीस नितीन गायकवाड, पनवेल तालुका विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत जाधव, भारतीय बौद्ध महासभा राज्य उपाध्यक्ष सुशील वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस विजय गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव, तसेच वंचित बहुजन आघाडीचे पनवेल कार्यकर्ते गणेश जाधव, विजय जाधव, संतोष कांबळे, स्वप्निल पवार, मंगेश जाधव आदींसह शहरातील लहान मोठ्या संघटना व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अलिबागमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ‘डफली बजाव’ आंदोलन
अलिबाग : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरात लॉकडाऊनच्या विरोधात व शासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात ‘डफली बजाव’ आंदोलन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप काही ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र, लॉकडाऊन विरोधात आता वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमक झाली आहे. बुधवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून वंचित आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डफली वाजवून घोषणाबाजी करीत थेट अलिबाग एसटी आगार गाठले.
राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी
कर्जत : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन उठविण्यात यावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरू करावी. या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन केली जात आहेत. कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एसटी आगारात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दीपक मोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व तालुक्यात आंदोलने केली जात आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. खासगी व्यवस्थापनांची कार्यालये आणि बाजारपेठ बंद करून ठेवण्यात आल्या. दुकाने, हॉटेल, मार्केट बंद करण्यात आले आहेत. हे सर्व निर्बंध हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, अनिल गवळे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, युवा अध्यक्ष प्रदीप ढोले, सरचिटणीस राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: ‘Play Duffy’ movement; Demand for removal of restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.