पनवेलमध्ये पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 05:47 AM2019-09-17T05:47:00+5:302019-09-17T05:47:03+5:30

शहर पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाºया दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Panvel police arrest two abductors, rioters | पनवेलमध्ये पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या दोघांना अटक

पनवेलमध्ये पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या दोघांना अटक

Next

पनवेल : शहर पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करणा-या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश दिलीप जाधव व भारत दिलीप जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत हे पिटर मोबाइल गाडीने पोलीस पथकासह रात्रगस्त करत होते. यावेळी एका महिलेने तिची दोन मुले आणि सुना शिवीगाळ करून दमदाटी करीत असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. या तक्र ारीची शहानिशा करण्यासाठी राजपूत हे केले असता तक्रार केलेल्या महिलेच्या दोन्ही मुलांनी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनाच शिवीगाळ करीत त्यांना दमदाटी तसेच त्यांना शिवीगाळही केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Panvel police arrest two abductors, rioters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.