पनवेलमध्ये पुन्हा ‘महिला’राज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:44 AM2019-11-14T01:44:25+5:302019-11-14T01:44:35+5:30

नवी मुंबईच्या जवळच्या पनवेल शहराचे महापौरसुद्धा या वेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.

In Panvel again the 'lady' raj | पनवेलमध्ये पुन्हा ‘महिला’राज

पनवेलमध्ये पुन्हा ‘महिला’राज

Next

नवी मुंबईच्या जवळच्या पनवेल शहराचे महापौरसुद्धा या वेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. पनवेल महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आगामी महापौरपदावरून सत्ताधारी भाजपात रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा नैना प्रकल्प, मेट्रो आदी प्रकल्पामुळे पनवेलकडे दुसरे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात आहे. या परिसरात आगामी काळात मोठ्या प्रमाणात गृहनिर्मिती होणार आहे. विकासाचे अनेक टप्पे नियोजित करण्यात आले आहे. पनवेल बस डेपोचा कायापालट केला जाणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे. येत्या काळात पनवेलचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पनवेलच्या महापौरालाही तितकेच महत्त्व असणार आहे. या पार्श्वभीवर पनवेलच्या दुसऱ्या महापौरपदाचा मान कोणत्या भाग्यवान नगरसेविकेला मिळतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.पूर्वाश्रमीच्या नगरपालिकेचे १ आॅक्टोबर २0१६ मध्ये पनवेल महापालिकेत रूपांतरण झाले. त्यानंतर लगेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील एकूण ७८ जागांपैकी भाजपने ५१ जागा जिंकत महापालिकेवर सत्ता स्थापन केली. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांची वर्णी लावण्यात आली. डॉ. चौतमोल यांचा महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे लवकरच पनवेलच्या महापौरपदी पुन्हा एका महिलेची वर्णी लागणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, या वेळी महापौरपद पुन्हा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने महापौरपदावर डोळा लावून बसलेल्या भाजपातील अनेक नगरसेवकांची निराशा झाली आहे. त्यामुळे आपली संधी हुकली तरी महापौरपद आपल्याच घरी यावे, या दृष्टीने विद्यमान नगरसेविकांच्या घरातील पुरूष मंडळीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असले तरी पनवेलमधील भाजपचे प्रमुख माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर हे आगामी महापौरपदासाठी कोणाची शिफारस करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: In Panvel again the 'lady' raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल