in navi mumbai car hits several vehicles and pedestrians after driver lost control | कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अनेक गाड्यांना, पादचाऱ्यांना धडक; दोघांचा मृत्यू
कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अनेक गाड्यांना, पादचाऱ्यांना धडक; दोघांचा मृत्यू

पनवेल: कामोठे शहरात सेक्टर ६ मध्ये कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं मोठा अपघात झाला. कारनं अनेक वाहनांना धडक देत पादचाऱ्यांना उडवल्याची घटना रात्री ८.१५ च्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.एमएच 01 बीएफ 993 या स्कोडा कारनं धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर होती. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Web Title: in navi mumbai car hits several vehicles and pedestrians after driver lost control
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.