काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेत ६० ते ७० वयाेगटांत सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठ नागरिकांना धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:53 AM2020-12-02T00:53:58+5:302020-12-02T00:54:19+5:30

काळजी घेण्याचे आवाहन

Most deaths in the 60-70 age group are due to the first wave of Carina virus; Senior citizens remain at risk | काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेत ६० ते ७० वयाेगटांत सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठ नागरिकांना धोका कायम

काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेत ६० ते ७० वयाेगटांत सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठ नागरिकांना धोका कायम

Next

नामदेव मोरे

नवी मुंबई :  कोरोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबईमध्ये ६० ते ७० वयोगटांतील ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. या वयोगटातील तब्बल २८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर कमी झाला असला, तरी अद्याप ज्येष्ठ नागरिकांना धोका कायम असून, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना बळींचा आकडा एक हजारच्या टप्प्यावर पोहोचला आहे. महानगरपालिका प्रशासनाने शून्य मृत्युदर मोहीम राबवून मृतांचा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यानंतरही प्रतिदिन २ ते ३ जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत ९८४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामधील ५३२ ज्येष्ठ नागरिक आहेत.

५० ते ६० वयोगटांतील मृतांचा आकडाही २६२ आहे. ६० ते ७० वयोगटातील सर्वाधीक २८६ जणांचा जणांचा मृत्यू झाला आहे. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व इतर सहव्याधींमुळे उपचारास योग्य प्रतिसाद मिळत नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

ऐरोलीसह कोपरखैरणेत सर्वाधिक मृत्यू 
शहरात सर्वाधिक १५२ जणांचा मृत्यू ऐराेलीमध्ये व १५० जणांचा मृत्यू कोपरखैरणेत झाला आहे. दाट लोकवस्तीमुळे या परिसरात रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली होती. n वेळेत चाचण्या करण्याविषयी उदासीनतेमुळे रुग्ण वेळेत शोधता येत नाहीत. यामुळे मृत्यूची संख्या जास्त झाली आहे. शहरवासीयांनी ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

Web Title: Most deaths in the 60-70 age group are due to the first wave of Carina virus; Senior citizens remain at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.