वृद्धाची हत्या करणाऱ्या साधूला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:19 AM2020-11-23T00:19:19+5:302020-11-23T00:19:27+5:30

पामबीचवर आढळला होता मृतदेह

Monk arrested for killing old man | वृद्धाची हत्या करणाऱ्या साधूला केली अटक

वृद्धाची हत्या करणाऱ्या साधूला केली अटक

Next

नवी मुंबई : वृद्धाच्या हत्येप्रकरणी सानपाडा पोलिसांनी एका साधूला अटक केली आहे. किरकोळ वादातून त्याने वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केली. चार दिवसांपूर्वी वाशी रेल्वे पुलालगत या वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता.

पामबीच मार्गावरील वाशी येथील रेल्वे पुलावर गुरुवारी एक मृतदेह आढळून आला होता. अधिक चौकशीत हा मृतदेह नेरूळ सेक्टर २ मधील रहिवासी ननकू शामलाल राजभर (५३) यांचा असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अहवालात हा त्यांचा मृत्यू डोक्यावर घाव लागल्याने झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीलेश राजपूत, उपनिरीक्षक परशुराम भातुसे, हवालदार अशोक पानसरे, विजय विसे, संकेत साठले व अभय काकड यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळ परिसराची पाहणी व परिसरात चौकशी केली असता मारेकऱ्याचा सुगावा लागला. घटनास्थळाच्या परिसरात एक साधू काही दिवसांपासून वावरत होता. यामुळे त्याचा शोध घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रवी शर्मा (३०) असे अटक केलेल्या साधूचे नाव आहे. तो अनेक वर्षे हिमालयात तपश्चर्या केल्यानंतर नवी मुंबईत आला होता. घटनेच्या दिवशी त्याचा ननकूसोबत किरकोळ वाद झाला. यातून रवीने बॅनरचा लोखंडी रॉड ननकूच्या डोक्यात मारला असता त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्याने तेथून पळ काढला असता पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली आहे.
 

Web Title: Monk arrested for killing old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.