वाशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:49 AM2021-05-06T00:49:37+5:302021-05-06T00:50:02+5:30

आरक्षणविषयी निर्णयाचे पडसाद : आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Maratha Kranti Morcha agitation at Vashi Toll Naka | वाशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

वाशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी मुंबईमध्ये पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती माेर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वाशी टोल नाक्यावर आंदोलन करून सरकारविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. सरकार न्यायालयात योग्य बाजू मांडू शकले नाही. गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत. या निर्णयामुळे समाजातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या. आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश कदम, बाळासाहेब शिंदे, सत्यवान गायकवाड, विनायक जाधव, मयूर धुमाळ, आशिष मोरे, अझर शेख, दर्पण कदम, राहुल शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले की निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतु खचून न जाता पुन्हा लढा उभारून सनदशीर मार्गाने  संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Maratha Kranti Morcha agitation at Vashi Toll Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.