कोरोनाकाळात केले तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:38 PM2021-02-26T23:38:33+5:302021-02-26T23:38:39+5:30

कोविडबाबत अनेक गैरसमज निर्माण झालेले असताना पनवेल उपजिल्हा रुग्णालात सुमारे ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

As many as 799 bodies were autopsied during the Corona period | कोरोनाकाळात केले तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन

कोरोनाकाळात केले तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन

Next

वैभव गायकर

पनवेल : कोरोनाकाळात भीतीपोटी माणूस माणसाच्या जवळ उभा राहत नव्हता. मात्र अशा परिस्थितीतही शेकडो मृतदेहांचे शवविच्छेदन करणारे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे काम काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले आहे. 

कोविडबाबत अनेक गैरसमज निर्माण झालेले असताना पनवेल उपजिल्हा रुग्णालात सुमारे ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात न्यायवैद्यक शास्त्रतज्ज्ञ डॉ. बी. एम. काळेल यांनी ही यशस्वी कामगिरी केली. विशेष म्हणजे कोविडला सुरुवात झाल्यापासून आजतागायत डॉ. काळेल आणि त्यांची संपूर्ण टीम मृतदेहांचे शवविच्छेदन करत आहे.

कोविड काळात कामगिरी  बजावल्याने अनेक डॉक्टर आरोग्यसेवेतील घटकांना कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांचे योगदान त्यासाठी होतेच मात्र माणसांच्या संपर्कात येऊन मृतदेहांच्या संपर्कात येणे व त्यांचे शवविच्छेदन करणे हेही काम अतिशय जिकरीचे होते. एक नव्हे तर तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन करणारे पनवेलमधील डॉक्टर काही प्रमाणात दुर्लक्षितच राहिले आहेत.
मार्च २०२० पासून पनवेल उपजिल्हा आजतागायत डॉ. काळेल व त्यांची टीम आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. 

या डॉक्टरांना आजवर सन्मानित करण्यात आले नसले तरी आपले कर्तव्य बजावताना हे डॉक्टर एक पाऊलदेखील मागे हटलेले नाहीत. ७९९ मृतदेहांमध्ये ६० मृतदेह कोरोनासदृश होते. डॉ. काळेल यांच्यासमवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, शवचिकित्सा सहायक जयेश देशमुख, एम. सदाप आदींचा समावेश आहे.

या शवविच्छेदनामध्ये आत्महत्या, अपघात, आकस्मित निधन, गळफास, पाण्यात बुडालेले, ताप तसेच इतर आजारांनी मृत्युमुखी पावलेल्या मृतदेहांचा समावेश आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला कोविडमध्ये जिल्हा कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता.  यावेळी अधीक्षक म्हणून डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या बदलीनंतर डॉ. बी. एस. लोहारे यांनी आम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन केले असल्याचे डॉ. काळेल यांनी सांगितले. 

Web Title: As many as 799 bodies were autopsied during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.