Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 02:14 AM2019-09-23T02:14:25+5:302019-09-23T02:14:55+5:30

चाकारमान्यांना गावच्या नेत्यांचे साकडे; नवी मुंबई, मुंबईतील मतदानावर परिणामाची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha 2019 The risk of voting twice has been avoided due to the elections in the same phase | Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : संपूर्ण राज्यात एकाच टप्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे दुबार मतदान होण्याचा धोका टळला आहे. चाकरमान्यांना गावाकडे यावे यासाठी स्थानिक नेत्यांनी साकडे घालण्यास सुरवात केली आहे. यामुळे यावेळीही मतदारांची पळवापळवी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे नवी मुंबई, मुंबईसह ठाणे परिसरातील काही मतदार संघातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये २०१४ च्या लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गावाकडे मतदान करा व नंतर मुंबईत येवून येथेही मतदान करा असे आवाहन केले होते. दुबार मतदानासाठी केलेल्या आवाहनामुळे खळबळ उडाली होती. वास्तवीक कोकण व पश्चिीम महाराष्ट्रामधील नागरिकांची मुंबईमध्येही मतदार यादीमध्ये नावे असून मुळ गावाकडील मतदार संघामध्येही अनेकांची मतदार यादीमध्ये नावे आहेत. याशिवाय अनेक मुंबईकर गावाकडे कार्यकर्त्यांची भुमीका बजावत असतात.

दोन पेक्षा जास्त टप्यात मतदार झाले की काहीजण गावाकडे जावून मतदार करतात व पुन्हा मुंबईमध्ये येवून मतदार करत असतात. परंतु विधानसभा निवडणुका एकाच टप्यात होणार असल्यामुळे आता दोन ठिकाणी नावे असली तरी मतदान एकाच ठिकाणी करता येणार आहे.

या मतदार संघात प्राबल्य
सातारा जिल्ह्यातील सातारा,वाई, माण, पाटण, कोरेगाव मतदार संघामध्ये मुंबईमधील चाकरमान्यांचे प्राबल्य आहे. सांगलीमधील शिरूर, पुणे जिल्ह्यामधील भोर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर मतदार संघामध्ये मुंबईतून जाणारे कार्यकर्ते व मतदारांची भुमीका महत्वाची असते.

या मतदार संघावर होणार परिणाम 
मतदारांचे स्थलांतर झाल्यास नवी मुंबईमधील ऐरोली, बेलापूर, पनवेल या मतदार संघातील मतदानावर परिणार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या येथील उमेदवारांना स्थलांतर रोखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

झालेले मेळावे
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी नवी मुंबईमधील संपर्क वाढविला आहे. यामध्ये सातारा मतदार संघाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमीत कदम, भोर चे आमदार संग्राम थोपटे, शिरूर मतदार संघातील काही नेत्यांनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे घेतले आहेत.
गावाकडे झालेल्या मेळाव्याला मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांना आग्रहाने बोलावून घेण्यात आले होते. रविवारी २२ सप्टेंबरला सातारामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यालाही नवी मुंबईमधून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले होते.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 The risk of voting twice has been avoided due to the elections in the same phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.