अयोध्येत नक्की जा म्हणजे तुमचे हिंदुत्वाचे खरे रक्त जागे होईल, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 05:16 PM2020-02-16T17:16:26+5:302020-02-16T17:30:11+5:30

शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Go to Ayodhya so your true blood will wake up, Devendra Fadnavis attacks Shiv Sena | अयोध्येत नक्की जा म्हणजे तुमचे हिंदुत्वाचे खरे रक्त जागे होईल, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

अयोध्येत नक्की जा म्हणजे तुमचे हिंदुत्वाचे खरे रक्त जागे होईल, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Next

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक भाजपाचे नेते उपस्थित आहेत. यावेळी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला. याशिवाय, सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना कशी बसते? अशा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. मात्र, त्यांनी अयोध्येला नक्की जावे. कारण, त्यांचे खरे हिंदुत्वाचे रक्त जागे होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह जवळपास अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक  स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला असून, या अधिवेशनामुळे पक्षाला लागणारी गळती थांबणार का? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

- चंद्रकांत दादा कालही विनिंग टीमचे कॅप्टन होते आणि आजही आहेत.
- महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वबळावर भाजपाचे सरकार आणणार
- भाजपा ही हरलेली टीम नाही तर जिंकेलली टीम आहे
- भाजपात पद म्हणजे जबाबदारी, मिरवण्यासाठी नाही 
- भाजपात कोणतीही गोष्ट वारसात मिळत नाही 
- भाजपा सामान्य जनतेचा विचार करणारा पक्ष 
- भाजपात देशात आणि राज्यात मोठ्या नेत्यांची परंपरा 
- अयोध्या आणि राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना टोला
- अयोध्येत नक्की जा, म्हणजे तुमचं रक्त जागे होईल.
- बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार देशाला दिला
- अयोध्येतील राम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिले आहे.
- 370 कलम हटविल्यामुळे काश्मीरमध्ये रक्ताचे पाट नाही, तर नवी पहाट उगवली 

- गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित 370 चा प्रश्न पंतप्रधान मोदी सरकारने मार्गी लावला
- काही लोक जाणून बुजून एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत संभ्रम पसरवला जात आहे
- काश्मीरमध्ये रक्ताचे पाट, नाही तर नवी पहाट उगवली
- सीएए कायद्याची मागणी नेहरू, शास्त्रींनी केली होती 
- मोदी सरकारच्या काळात राम मंदिराची निर्मिती झाली 
- सत्तेसाठी काही मोठे नेते खोटे बोलत आहेत 
- सीएए मागासवर्गीय, आदिवासी विरोधी असल्याचे सिद्ध करा, शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांचे आव्हान
- भाजपाचे ऐकून घेण्याचे दिवस संपले 
- आता बचावात्मक धोरण नको, आक्रमक बना
- भाजपाचा विश्वासघात झाला आहे
- सत्तेसाठी काही पक्ष जल-दल बिना तडफडत आहेत 
- काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचे वचन दिलं होत का? उद्धव ठाकरेंना सवाल
- भाजपाचे लढण्याचे दिवस आहेत. 
- ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला
- आम्ही तिघे असलो तरी तिघांचा सामना करू
- प्रकल्पांची नावे बदला, पण जनहितांचे काम
- पुन्हा जनतेच्या कोर्टात जाण्याची हिम्मत दाखवा
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना कशी बसते?
- धुळे जिल्हा परिषदमध्ये आपण तिन्ही पक्षांना हरविले. आता महापालिका निवडणूक येत आहे.
- नवी मुंबईपासून आता नवी सुरुवात होणार आहे. आपल्या विजयाची सुरुवात याच नव्या मुंबईपसून करणार आहोत. नवी मुंबई आणि औरंगाबाद मध्ये महापौर भाजपाचा असेल.

Web Title: Go to Ayodhya so your true blood will wake up, Devendra Fadnavis attacks Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.