Ganesh Naik reunites with Jitendra Awhad; Prasad's statement on Sharad Pawar | गणेश नाईक-जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा जुंपली; शरद पवारांवरील वक्तव्याचे पडसाद

गणेश नाईक-जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा जुंपली; शरद पवारांवरील वक्तव्याचे पडसाद

नवी मुंबई /ठाणे : नवी मुंबई महापालिकेची येऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूकगणेश नाईक- जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे चांगलीच रंगणार आहे. बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा बाप एकच आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीका केली होती. आव्हाडांच्या या टीकेला उत्तर देताना बुधवारी नाईक यांनी शरद पवार यांनीही पक्ष बदलले आहेत. मग त्यांचाही बाप काढणार का, असा सवाल केला आहे.

तर पक्षांतर करणाºया शरद पवारांची गणनाही बाप बदलणाºया औलादींमध्ये करणार का? या गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नाईक हे कृतघ्न असल्याचा आरोप बुधवारी केला आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भूमिकेवर दर दहा वर्षांनी मला बाप बदलण्याची सवय नाही, असा टोला मंगळवारी आव्हाड यांनी लगावला होता. त्याला नाईक यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे. एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार यांची गणनादेखील बाप बदलणाºया औलादीत करणार का, असा प्रतिप्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे की, शरद पवारांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहीत आहे, हे मला माहीत नाही. शरद पवार यांनी बाप नाही बदलला, तर ते स्वत:च बाप झालेत. १९७७ आणि १९९९ साली त्यांनी पक्ष काढून तुमच्यासारखे ६० ते ७० आमदार निवडून आणले. त्याला बाप बदलणे, नव्हे बाप होणे म्हणतात. तुम्ही कृतघ्न आहात, हेच मला नवी मुंबईकरांना दाखवायचे होते. ते मी पुराव्यानिशी दाखवून दिले, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आगरी समाजाची घरे पाडत असताना नाईक कधी धावून गेले नाहीत, मी गेलो होतो, विटाव्याची घरे पाडत असताना जेव्हा जेव्हा आगरी समाजावर संकट आले, तेव्हा तेव्हा तुम्ही कायद्याची चौकट दाखवत निघून गेलात. पुन:सीमांकन झाले पाहिजे, हे दाखवून देण्याची ताकद आमच्यात आहे. ते आम्ही करून दाखवले, तुम्ही ते नाही केलेत. आपला राजकीय हेतू साध्य व्हावा, यासाठी आपल्या मुलाचा बळी दिलात. तेव्हा समाजाची काय बिशाद, असे आव्हाड यांनी म्हटले.

खाली कोण घसरले?
तुमच्यावर केलेल्या उपकारांची तुम्हाला कधीही जाणीव नसते. आगरी समाजाने असो, नवी मुंबईकरांनी असो, बाळासाहेबांनी असो की, शरद पवारांनी; तुम्ही त्यांची जाण कधीच ठेवली नाही. महत्त्वाचे म्हणजे बाप काढण्याचे विधान तुमचे आहे, मी बाप काढला नाही. कुठल्या तरी फडतूस पिक्चरचा डायलॉग वापरून तुम्ही बाप काढला होता. त्यामुळे खाली घसरलात तुम्ही की मी, हे आठवले तर बरे, असेही आव्हाड यांनी म्हटले.

Web Title: Ganesh Naik reunites with Jitendra Awhad; Prasad's statement on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.