Four bodies were found inside a flat in Taloja | खळबळजनक! तळोजामध्ये एकाच घरात चौघांचे मृतदेह आढळले 

खळबळजनक! तळोजामध्ये एकाच घरात चौघांचे मृतदेह आढळले 

ठळक मुद्देतळोजा फेज वनमधील सेक्टर 9 येथील शिव कॉर्नर सोसायटीत राहणाऱ्या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. हे कुटुंब येथे भाडेत्तवावर राहत होते.पतीने पत्नीसह आपल्या दोन लहान मुलांची हत्या करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पनवेल : तळोजा फेज वनमधील सेक्टर 9 येथील शिव कॉर्नर सोसायटीत राहणाऱ्या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. यात पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब येथे भाडेत्तवावर राहत होते. पतीने पत्नीसह आपल्या दोन लहान मुलांची हत्या करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे मृतदेह गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटमध्ये पडून होते, अशी माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 
 

Web Title: Four bodies were found inside a flat in Taloja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.