कळंबोली सर्कलवर वाहनांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:06 AM2020-09-26T00:06:19+5:302020-09-26T00:06:22+5:30

ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा ताण : कामावर जाणाऱ्या नागरिकांची होत आहे गैरसोय

Crowd of vehicles at Kalamboli Circle | कळंबोली सर्कलवर वाहनांची गर्दी

कळंबोली सर्कलवर वाहनांची गर्दी

Next

वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलवर दररोज प्रचंड वाहतूककोंडी होते आहे. ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याने, येथे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळते आहे. सर्कलजवळील ५ मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी तब्बल ३० ते ४५ मिनिटांपर्यंत या ठिकाणी थांबावे लागत आहे.


कळंबोली सर्कलजवळ सायन पनवेल महामार्ग, कळंबोली मुंब्रा महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग आदींसह कळंबोली जेएनपीटी आदी महामार्ग एकत्र येतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. लॉकडाऊनच्या काळात ट्रेन बंद असल्याने नोकरदार वर्ग खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे,
तसेच या परिसराला लागून जेएनपीटी बंदरावर जाण्यासाठी राज्यभरातील मालवाहतूक वाहने येथून जात असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारंबळ उडत आहे. सकाळी व संध्याकाळी होणाºया वाहतूककोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांना ठरावीक वेळेत बंदी घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ट्रेन सुरू झाल्या तर वाहनकोंडीतून सुटका होईल, असे सांगितले जात आहे.


वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आठ वाहतूक पोलीस नेमलेले आहेत. या मार्गावर जेएनपीटीकडे जाणाºया अवजड वाहनांची संख्याही मोठी आहे.
- अंकुश खेडेकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
कळंबोली वाहतूक शाखा


सकाळी व सायंकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी वाढत आहे. अवजड वाहने यासाठी कारणीभूत असल्याने ठरावीक वेळेसाठी अवजड वाहनांवर या ठिकाणी बंदी घालण्याची गरज आहे.
- प्रशांत कदम,
उपाध्यक्ष,
मनसे कळंबोली शहर

Web Title: Crowd of vehicles at Kalamboli Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.