coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी डॉक्टरांचीही शाळा, आयुक्तांकडून प्रतिदिन आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:23 AM2020-09-03T00:23:26+5:302020-09-03T00:24:03+5:30

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी बे्रक द चेन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील व इतर अधिकारी, कर्मचारीही दिवसरात्र राबत आहेत.

coronavirus: daily review by Commissioner for corona control | coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी डॉक्टरांचीही शाळा, आयुक्तांकडून प्रतिदिन आढावा

coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी डॉक्टरांचीही शाळा, आयुक्तांकडून प्रतिदिन आढावा

Next

 - नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर प्रतिदिन नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुखांशी व विभाग अधिकाऱ्यांचीही शाळा घेत आहेत. प्रतिदिन प्रत्येकाशी संवाद साधून रुग्णवाढ, कोरोनामुक्तीचे प्रमाण व मृत्युदर यावर चर्चा केली जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय रुग्णांचा आलेख तयार केला जात असून, सर्वांचे प्रगतिपुस्तक तपासले जात आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी बे्रक द चेन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील व इतर अधिकारी, कर्मचारीही दिवसरात्र राबत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल, तर प्रत्येक नागरी आरोग्य केंद्र व विभाग कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात आल्यामुुळे आयुक्तांनी प्रतिदिन या सर्वांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

सायंकाळी साडेसातनंतर रोज दोन ते अडीच तास सर्वांचे शाळा घेतली जात आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक विभागात वाढलेले रुग्ण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण व प्रतिदिन होणारे मृत्यू यावर सखोल चर्चा केली जात आहे. प्रत्येक मृत्युवर तज्ज्ञांचे म्हणने ऐकूण घेतले जात आहे.
आयुक्तांनी प्रत्येक आरोग्य केंद्र निहाय प्रतिदिन कामगिरीचा आलेख तयार करण्यास सुरुवात केला आहे. प्रत्येक ठिकाणी सद्यस्थितीमध्ये किती रुग्ण शिल्लक आहेत. कामगिरीमध्ये सातत्य आहे की नाही, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवले जात आहे.

२३ पैकी १४ नागरी आरोग्य केंद्र परिसरात रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ९ ठिकाणी शिल्लक रुग्णांची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्ण संख्या कमी करण्यात ज्यांनी यश मिळविले त्यांचे उदाहरण समोर ठेवून, त्याप्रमाणे उपाययोजना इतर ठिकाणी राबविण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त स्वत:च प्रतिदिन संवाद साधत असल्यामुळे नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टरही गांभीर्याने विविध उपाययोजना करू लागले आहेत.

१४ ठिकाणी रुग्णसंख्या नियंत्रणात
शहरातील तब्बल १४ नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात रुग्णसंख्या कमी झाली आहे.
यामध्ये तुर्भे, कातकरीपाडा, इंदिरानगर,दिघा, इलठाणपाडा, चिंचपाडा, शिरवणे, सीवूड सेक्टर ४८, सानपाडा, नोसीलनाका, नेरुळ फेज दोन, महापे, करावे, सीबीडी व ऐरोली नागरी आरोग्य केंद्राचाही समावेश आहे.

९ ठिकाणी रुग्णसंख्या जास्त
शहरातील ९ नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये शिल्लक रुग्ण संख्येचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये वाशी गाव, रबाळे, पावणे, नेरूळ फेज १, कुकशेल, खैरणे, जुहुगाव, घणसोली चा समावेश आहे.

Web Title: coronavirus: daily review by Commissioner for corona control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.