परवानगी नसलेल्या रुग्णालयातही केले जात आहेत कोरोनावर उपचार, कारवाई करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:04 AM2020-09-19T00:04:33+5:302020-09-19T00:04:43+5:30

नवी मुंबई जिल्हा काँगे्रसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी याविषयी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.

Coronas are also being treated in unlicensed hospitals, demanding action | परवानगी नसलेल्या रुग्णालयातही केले जात आहेत कोरोनावर उपचार, कारवाई करण्याची मागणी

परवानगी नसलेल्या रुग्णालयातही केले जात आहेत कोरोनावर उपचार, कारवाई करण्याची मागणी

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या रुग्णालयांमध्येच कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करता येतात, परंतु परवानगी नसलेल्या काही रुग्णालयांमध्येही उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नवी मुंबई जिल्हा काँगे्रसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी याविषयी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे तीन स्तरीय रचना तयार करण्यात आली आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर तयार करण्यात आली आहेत. मनपा रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील काही रुग्णालयांमध्ये परवानगी नसतानाही तेथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांकडून उपचारासाठी लाखो रुपये बिल आकारले जात आहे.
परवानगी नसताना उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. सदर ठिकाणी उपचार करताना काही चुका झाल्या व रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. आयुक्तांनी लवकर या तक्रारीची दखल घेतली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

संचारबंदी लागू करावी
नवी मुंबईमध्ये अनलॉक सुरू झाल्यापासून नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे. मास्कचा वापर केला जात नाही. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणीही रवींद्र सावंत यांनी केली आहे.

Web Title: Coronas are also being treated in unlicensed hospitals, demanding action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.