सायन - पनवेल महामार्गावर कॉंग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:35 PM2020-10-01T23:35:16+5:302020-10-01T23:35:24+5:30

आंदोलनामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास १५ मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना समजावून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Congress agitation on Sion-Panvel highway | सायन - पनवेल महामार्गावर कॉंग्रेसचे आंदोलन

सायन - पनवेल महामार्गावर कॉंग्रेसचे आंदोलन

Next

उत्तर प्रदेश सरकारने काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांना अटक केल्याचे पडसाद नवी मुंबईमध्येही उमटले. काँगे्रस कार्यकर्त्यांनी सायन - पनवेल महामार्गावर शिरवणे येथे रास्ता रोको केले. काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिरवणेजवळ सायन - पनवेल महामार्गावर आंदोलन केले. रोडमध्ये बसून वाहतूक थांबविली होती.

आंदोलनामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास १५ मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना समजावून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, फारूक अत्तार, विद्या भांडेकर, शेवंता मोरे, बबीन म्याथू, विजय पगारे, राहुल कापडणे, तुकाराम महाराज, विनय कांबळे, आदित्य सूर्यवंशी, श्रीराम पंधिरे, संग्राम इंगळे, सुरेश सदावर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress agitation on Sion-Panvel highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.