वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:26 AM2019-11-16T00:26:34+5:302019-11-16T00:26:38+5:30

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची आता करडी नजर असणार आहे.

A closer look at those who break traffic rules | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

googlenewsNext

नवी मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची आता करडी नजर असणार आहे. त्यासाठी दोन इंटर सेफ्टर वाहने वाहतूक विभागात दाखल झाली आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या वाहनातील अत्याधुनिक कॅमेºयाच्या माध्यमातून ५०० मीटर अंतरावरील वाहनांवर नजर ठेवता येणार आहे.
वाहतूक नियमांची पायमल्ली करणाºयांवर वचक बसावा म्हणून दंडात्मक रकमेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही वाहतूक नियम पायदळी तुडवले जात आहेत. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, मद्यपान करून वाहने चालविणे आदी नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. अशा बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचा बडगा दाखविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी आपल्या ताफ्यात आता दोन इंटर सेफ्टर वाहने दाखल करून घेतली आहेत. या वाहनांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर पाळत ठेवली जाणार आहे. अत्याधुनिक दर्जाचा कॅमरा, ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह टेस्टिंग मशिन व इतर सुविधा या वाहनात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते या वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. १८ नोव्हेंबरपासून या वाहनांच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाºयांवर नजर ठेवली जाणार आहे.

Web Title: A closer look at those who break traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.