नवी मुंबईतील सीवूड परिसरात किड्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:12 PM2019-10-10T12:12:38+5:302019-10-10T12:42:20+5:30

सीवूड परिसरातील नागरिक किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रोडवर, सोसायटीची भिंत व झाडांवर हजारो किडे आहेत.

Citizens suffer from insect attack in Seawood area of Navi Mumbai | नवी मुंबईतील सीवूड परिसरात किड्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त

नवी मुंबईतील सीवूड परिसरात किड्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त

googlenewsNext

 नवी मुंबई- सीवूड परिसरातील नागरिक किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रोडवर, सोसायटीची भिंत व झाडांवर हजारो किडे आहेत. किडे अंगावर पडल्याने शरीराला खाज सुटत असून मोटारसायकल चे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


 शहरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.  बदलत्या वातावरणामुळे सिवूडमध्ये अचानक किड्यांची संख्या वाढली आहे.  रेल्वे  स्टेशन ते सेक्टर 50 कडे जाणा-या रोडवर सर्वत्र किडे दिसू लागले आहेत.  काही सोसायटी च्या संरक्षण भिंत , रोड व वृक्षही किड्यांनी व्यापले आहेत. रोडवरून जाणा-या पादचा-यांच्या अंगावर किडे पडत आहेत. झाडावरून  खाली   जाळ्यामध्ये किडे लोंबकळत असल्याने सकाळी मोटारसायकल चा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  याविषयी रहिवासी व लोकप्रतिनिधींनी महानगरपालिका प्रशासनास व वनविभागालाही कळविले आहे. वनविभागाचे कर्मचारी  घटनास्थळी येवून पाहणी करत आहेत. 

Web Title: Citizens suffer from insect attack in Seawood area of Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.