व्यापारी प्रतिनिधी निवडीत चुरस; आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 01:04 AM2020-02-29T01:04:01+5:302020-02-29T01:04:05+5:30

एपीएमसीमध्ये कडक बंदोबस्त; कांदा, मसाला, धान्य मार्केटमध्ये लढत

Business Representatives Choice In Choice; Voting today | व्यापारी प्रतिनिधी निवडीत चुरस; आज मतदान

व्यापारी प्रतिनिधी निवडीत चुरस; आज मतदान

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. चार व्यापारी प्रतिनिधींच्या निवडीसाठी बाजार समितीमध्ये मतदान होणार आहे. एक ठिकाणी चौरंगी व तीन ठिकाणी तिरंगी लढत होणार असून चारही ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचा प्रयोग केला जात आहे. काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकाप यांनी पॅनेल तयार केले आहे. भाजपनेही पहिल्यांदा बाजार समिती निवडणुकीवर लक्ष दिले आहे. मार्केटमधील पाच व्यापारी प्रतिनिधी मात्र कोणत्याही पॅनेलमध्ये सहभागी झालेले नाहीत. पाचपैकी फळ मार्केटमधील निवडणूक बिनविरोध झाली आहे. कांदा मार्केटमध्ये यापूर्वीचे संचालक अशोक वाळूंज व कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. मार्केटमध्ये परिवर्तन होणार की पूर्वीचेच संचालक निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजी मार्केटमध्ये चार उमेदवार रिंगणात आहेत. माजी संचालक शंकर पिंगळे व के. डी. मोरे यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. मसाला मार्केटमध्ये माजी संचालक कीर्ती राणा व अशोक राणावत यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. मसाला मार्केटमध्ये प्रत्येक वस्तुनिहाय व्यापारी संघटना आहे. १४ संघटनांची मिळूनही एक संघटना आहे. या मार्केटमध्ये या पूर्वीच्या निवडणुकांमध्येही परिवर्तन घडले होते. या वेळीही परिवर्तन घडणार की माजी संचालकांना संधी मिळणार, याविषयी उत्सुकता आहे. धान्य मार्केटमध्ये ग्रोमा संघटनेचा पाठिंबा असणारा उमेदवार निवडून येत असतो.

संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बंदोबस्तासाठी १०० पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक मतदानकेंद्राच्या बाहेरही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सहा महसूल विभागांमधील प्रत्येक जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयामध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बाजार समितीसाठी इच्छुक उमेदवार
कांदा मार्केट
अशोक देवराम वाळुंज
सुरेश रामचंद्र शिंदे
राजेंद्र काशिनाथ शेळके
भाजीपाला मार्केट
प्रताप नामदेव चव्हाण
शंकर लक्ष्मण पिंगळे
विठ्ठल आश्रू बडदे
काशिनाथ दिनकर मोरे
धान्य मार्केट
लक्ष्मणदास वेलजी भानुशाली
पोपटलाल केशरमल भंडारी
नीलेश रमनिकलाल वीरा
मसाला मार्केट
विजय वनमालीदास भुत्ता
अशोक उमरावचंद राणावत
कीर्ती अमृतलाल राणा

Web Title: Business Representatives Choice In Choice; Voting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.