श्रमदानातून दुष्काळग्रस्तांना मदत, सिडको अध्यक्षांचा उपक्र मात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:39 AM2019-05-08T02:39:56+5:302019-05-08T02:40:31+5:30

पारनेर भागात पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या अभियानात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच सहभाग घेऊन कार्यकर्त्यांसह श्रमदान केले.

Assistance to the drought-hit people from the labor, and the participation of the SIDCO chief | श्रमदानातून दुष्काळग्रस्तांना मदत, सिडको अध्यक्षांचा उपक्र मात सहभाग

श्रमदानातून दुष्काळग्रस्तांना मदत, सिडको अध्यक्षांचा उपक्र मात सहभाग

Next

पनवेल : पारनेर भागात पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या अभियानात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच सहभाग घेऊन कार्यकर्त्यांसह श्रमदान केले.
पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासते. सातत्याने या तालुक्याला दुष्काळाच्या सावटाचा इतिहास आहे. त्यामुळे पारनेरचे अनेक कुटुंब नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यापैकी बहुतांशी कुटुंब पनवेल परिसरात राहतात. त्यामुळे पारनेर आणि पनवेल तालुक्यांचा संबंध जवळचा आहे.
मुंबईस्थित अनेक पारनेरकर आपल्या गावातील शिवार जलयुक्त व्हावे, या दृष्टिकोनातून पाणी फाउंडेशन या अभियानात सहभागी झालेले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी, वाहतूकदार, व्यापारी, आपल्या मूळ गावी जाऊन श्रमदान करतात.
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या अभियानासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पारनेर तालुक्यातील हरेश्वर येथे निमंत्रित केले होते. त्यानुसार ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह हरेश्वर येथील श्रमदानात सहभागी झाले होते.

Web Title: Assistance to the drought-hit people from the labor, and the participation of the SIDCO chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.