नेरुळमध्ये घुमला अध्यात्माचा गजर; साठ हजार भाविकांची उपस्थिती; दहा हजार स्वयंसेवकांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:46 AM2019-12-05T02:46:51+5:302019-12-05T02:47:07+5:30

दहा हजार स्वंयसेवक, बी.ए.पी.एस. संस्थेचे ७५० साधू आणि देश-विदेशातून आलेल्या ६० हजारांपेक्षा अधिक भक्तगणांच्या उपस्थितीत संपूर्ण नेरुळ परिसरात अध्यात्माचा गजर अनुभवयास आला.

The alarm of spirituality roaming in Nerul; Presence of sixty thousand devotees; An army of ten thousand volunteers | नेरुळमध्ये घुमला अध्यात्माचा गजर; साठ हजार भाविकांची उपस्थिती; दहा हजार स्वयंसेवकांची फौज

नेरुळमध्ये घुमला अध्यात्माचा गजर; साठ हजार भाविकांची उपस्थिती; दहा हजार स्वयंसेवकांची फौज

Next

नवी मुंबई : नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये प्रमुख स्वामी महाराज यांच्या ९८ व्या जयंती महोत्सवाचे नेत्रदीपक आयोजन करण्यात आले होते. दहा हजार स्वंयसेवक, बी.ए.पी.एस. संस्थेचे ७५० साधू आणि देश-विदेशातून आलेल्या ६० हजारांपेक्षा अधिक भक्तगणांच्या उपस्थितीत संपूर्ण नेरुळ परिसरात अध्यात्माचा गजर अनुभवयास आला.
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून मुंबईतील स्वामीनारायण मंदिराच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात व्यसनमुक्ती, पालक जागृती अभियान, बालक-युवक जागृती आदी सेवाभावी उपक्रमांचे समावेश होता. तसेच बी.ए.पी.एस. संस्थेशी जुळलेल्या बालक व युवकांच्या माध्यमातून सव्वा लाख घरांत संपर्क करून कौटुंबिक शांततेचा संदेश देण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी आत्मतृप्त स्वामी, अक्षरवत्सल स्वामी, आनंदस्वरूप स्वामी, ब्राम्हविहारी स्वामी, कोठारी भक्तिप्रिय स्वामी, ईश्वरचरण स्वामी आदीनी प्रमुख स्वामी महाराज यांच्या माध्यमातून नशामुक्ती, तणावमुक्ती, अश्रद्धा, अहंकार आणि विश्वास आदीबाबत देश-विदेशातील लाखो नागरिकांना आलेल्या अनुभवांची माहिती दिली. प्रमुख स्वामी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथाच्या तिसऱ्या भागाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वेळी प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्र माला माजी राज्यपाल डॉ. डि.वाय.पाटील, आमदार गणेश नाईक, आशिष शेलार, आमदार प्रशांत ठाकूर, विजय पाटील, रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर झालेल्या स्वामी नारायण सतसंग कार्यक्रमास ४० हजारांहून अधिक भक्त उपस्थित राहिले होते. या दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्यानुसार स्टेडिअमभोवती, प्रवेशाच्या मार्गावर तसेच आतमध्ये सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामध्ये परिमंडळ उपायुक्तांसह सहायक उपायुक्त, १४ पोलीस निरीक्षक, ५९ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासह ५०० पोलीस कर्मचारी व ३५० वाहतूक पोलिसांचा समावेश होता. स्टेडिअममध्ये प्रवेशाच्या मार्गावरही पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. त्या ठिकाणावरून प्रवेशिका असणाऱ्यांनाच आत प्रवेश दिला जात होता. याकरिता पोलिसांच्या मदतीला आयोजकांच्या वतीने स्वयंसेवकही नेमण्यात आले होते. तर भाविक, महत्त्वाच्या व्यक्ती तसेच अति महत्त्वाच्या व्यक्ती यांना स्वतंत्र प्रवेशमार्गाने आत सोडले जात होते.

कार्यक्रमस्थळी वाहतुकीत बदल
कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने त्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता होती. यामुळे वाहतूक पोलिसांनी एल.पी. पुलाखालील चौकातील वळण बंद करण्यात आले होते. बुधवारी दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत हा वाहतुकीतील बदल करण्यात आला होता. याकरिता तुर्भेकडून येणाºया वाहनांना नेरुळमध्ये प्रवेशासाठी शिरवणे मार्गे अथवा उरण फाटा पुलाखालून प्रवेश दिला जात होता. तर स्टेडिअम लगतच्या सर्व बाजूच्या मार्गांवर नो पार्किंग करण्यात आले होते. मात्र, उरणफाटा येथील पुलाखालून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्याशिवाय गव्हाणफाटा ते उरणफाटा दरम्यानही जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. यामुळे दुतर्फा जाणारी ही जड-अवजड वाहने महापे येथून शिळफाटा मार्गे एमआयडीसीमधून कळंबोलीकडे वळवण्यात आली होती.

महंत स्वामी महाराजांचे विशेष रथातून आगमन
महंत स्वामी महाराजांचे आगमन होण्यापूर्वी ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. विविध भाषेतील भक्तिगीतांच्या तालावर लहान मुलांनी नृत्ये सादर केली. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील संकुलाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी सजावट करण्यात आलेला विशेष रथ चालवत महंत स्वामी महाराजांना संपूर्ण स्टेडियम परिसरात मिरवणूक काढत रंगमंचापर्यंत आणले.

कलाकारांची उपस्थिती
कार्यक्र माच्या निमित्ताने टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील टीम उपस्थित होती. मालिकेत जेठालाल ची भुमीका करणारे दिलीप जोशी यांनी प्रमुख स्वामी महाराज यांच्याशी झालेली भेट आणि अनुभव विशद केले.

भक्तांमध्ये उत्साह
प्रमुख स्वामी महाराज यांच्या ९८ व्या जन्मजयंती महोत्सवानिमित्त देश आणि विदेशातील भक्त उपस्थित होते. या कार्यक्र मामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

स्टेडियमची सजावट
प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. रंगमंचावरील कार्यक्र म उपस्थितांना पाहता यावा यासाठी स्टेडियमवर ठिकठिकाणी स्क्र ीनही बसविण्यात आल्या होत्या.

Web Title: The alarm of spirituality roaming in Nerul; Presence of sixty thousand devotees; An army of ten thousand volunteers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.