नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 01:54 AM2020-01-24T01:54:28+5:302020-01-24T01:55:40+5:30

पोलिसांनी वर्षभर जनजागृती करण्याबरोबर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यामुळे अपघातांची संख्या कमी करण्यास यश येऊ लागले आहे.

The accident rate in Navi Mumbai is lower, with 239 deaths in 744 accidents | नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू

नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. २०१६ मध्ये १,८५४ अपघात झाले होते. २०१९ मध्ये ही संख्या ७४४ वर आली आहे. पोलिसांनी जनजागृतीबरोबर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. वर्षभरात तब्बल पाच लाख ५५ हजार केसेस केल्या असून, मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया २,८५६ जणांवर कारवाई केली आहे.

नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये चार वर्षांपूर्वी अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. अपघातामध्ये ठार व गंभीर जखमी होण्याची संख्याही गंभीर होत चालली होती. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई -पणे द्रुतगती महामार्ग, पामबीच रोड, ठाणे-बेलापूर, जेएनपीटी महामार्ग व इतर अंतर्गत रोडवर वारंवार अपघात होऊ लागले होते. अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. वर्षभर जनजागृती करण्याबरोबर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यामुळे अपघातांची संख्या कमी करण्यास यश येऊ लागले आहे. २०१८ मध्ये एकूण १,२०३ अपघात झाले होते, यामध्ये २७० जणांचा मृत्यू होऊन ५३२ जण गंभीर जखमी झाले व ११८ जण किरकोळ जखमी झाले होते. २०१९ मध्ये अपघाताची संख्या ७४४ वर आली असून, २३९ जणांचा मृत्यू होऊन ५८९ जण गंभीर व १४८ जण किरकोळ जखमी झाले. गतवर्षीच्या तुलनेमध्ये अपघातांची संख्या ४५९ ने कमी झाली आहे. यात मृत्यू होणाºया प्रवाशांची संख्या ३१ ने कमी झाली आहे.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व इतर आस्थापनांकडे पाठपुरावा करून रस्ते चांगले करून घेतले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यास प्राधान्य दिले आहे. नियम तोडणाºयांवर कडक कारवाई केली जात आहे. २०१८ मध्ये चार लाख सहा हजार ८३० केसेस करून आठ कोटी ४२ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल केला होता. २०१९ मध्ये तब्बल पाच लाख ५५ हजार १६८ केसेस करून १५ कोटी ५० लाख ७९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. गतवर्षी मद्यप्राशन करणाºया २,८५६ वाहनचालकांवर कारवाई केली असून, त्यांना आठ लाख ५७ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. ६,८७० प्रकरणांमध्ये चालक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. वार्षिक गुन्ह्यांचा तपशील सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयुक्त संजय कुमार यांनी वाहतूक विभागाच्या उपाययोजनांसह नागरिकांनीही नियमांचे पालन करण्यास सहकार्य केल्यामुळे अपघात कमी होत असल्याचे स्पष्ट केले.

कारसह मोटारसायकलचे सर्वाधिक अपघात
पोलिसांनी कोणत्या वाहनांचे सर्वाधिक अपघात होतात याविषयी अहवाल तयार केला आहे. मोटारसायकल व कारचे सर्वाधिक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मोटारसायकलस्वार हेल्मेटचा वापर करत नाहीत. कार चालक सीटबेल्टचा वापर करत नाहीत. मोबाइलवर बोलून कार चालविली जाते. अतिवेग व इतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त होते. यामुळे कारवाई करताना व जनजागृतीमध्येही यास प्राधान्य दिले होते. त्याचाही सकारात्मक परिणाम होऊन मोटारसायकल व कारचे अपघातही गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी होऊ लागले आहेत.

अज्ञात वाहनांचा शोध घेण्याचे आव्हान
महामार्ग व इतर ठिकाणी अपघात झाल्यानंतर अनेक वाहनचालक घटनास्थळावरून पळ काढत असतात. अपघात करणाºया या अज्ञात वाहनांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. २०१६ पासून चार वर्षांत तब्बल ३२४ अज्ञात वाहनांनी अपघात केले आहेत. यामध्ये प्राणांतिक अपघातांचे प्रमाण जास्त आहे. या वाहनांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 

Web Title: The accident rate in Navi Mumbai is lower, with 239 deaths in 744 accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.