संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; वेगाने वाढताहेत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:37 PM2021-11-07T15:37:12+5:302021-11-07T15:45:44+5:30

Zika Virus : गेल्या 24 तासांत 13 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

zika virus outbreak in up kanpur kannauj know its symptoms and methods of prevention | संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; वेगाने वाढताहेत रुग्ण

संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; वेगाने वाढताहेत रुग्ण

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसनंतर आता झिका व्हायरसने कहर केला आहे. झिका व्हायरसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. डॉक्टरांनी देखील झिकाबाबत गंभीर इशारा दिला आहे. आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, झिकाच्या संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण कोरोना व्हायरसपेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झिकाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 13 नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरात आतापर्यंत झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 79 वर गेली आहे. त्याचबरोबर कन्नौजमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

देशात सर्वप्रथम, 2017 मध्ये गुजरातमध्ये 3 आणि 2018 मध्ये 1 प्रकरणे समोर आलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये तामिळनाडूमध्ये 1 केस समोर आली. 2018 मध्ये मध्य प्रदेशात झिका व्हायरची प्रकरणे अचानक वाढली आणि 130 लोकांना याची लागण झाल्याचे आढळून आले. त्याच वर्षी 2018 मध्ये राजस्थानमध्ये झिका व्हायरसची 159 प्रकरणे नोंदवली गेली होती. 2021 मध्ये झिका व्हायरसची प्रकरणे केरळमध्ये अचानक दिसू लागली. त्यानंतर 64 प्रकरणे समोर आली. दरम्यान, महाराष्ट्रात झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळून आला असून आता उत्तर प्रदेशमध्ये कानपूर आणि कन्नौजसह 80 रुग्ण आढळले आहेत.

'ही' आहेत लक्षणं

झिका व्हायरस पहिल्यांदा 1947 मध्ये समोर आला होता. युगांडाच्या झिका जंगलात हा संसर्ग आढळून आला. म्हणून या व्हायरसला झिका जंगलाचे नाव देण्यात आले. झिका व्हायरस हा डासांमार्फत पसरतो. झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात. पण झिका डेंग्यूपेक्षाही घातक आहे. ताप, अंगावर खुणा आणि सांधेदुखी ही त्याची लक्षणे आहेत.झिका व्हायरसच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे, स्नायू दुखणे आणि सांधेदुखी यांचा समावेश होतो. झिका विषाणू हा डासांमुळे पसरणारा आजार आहे, जो एडिस डासामुळे पसरतो. या प्रजातीच्या डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाही होतो. 

अशी घ्या काळजी

झिका व्हायरस असलेल्या लोकांमध्ये सहसा लक्षणे नसतात किंवा त्यांची लक्षणे खूप सौम्य असू शकतात. विशेष म्हणजे झिका व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. फक्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसपासून बचाव करण्यासाठी घरात डासांची पैदास होऊ देऊ नका. मच्छरदाणी वापरा. घराच्या खिडक्या आणि दारांवर जाळी बसवण्याची खात्री करा. बाहेरचे आणि पॅकेज केलेले अन्न खाणे टाळा मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: zika virus outbreak in up kanpur kannauj know its symptoms and methods of prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.