TikTok ला भारतीयांचा जोरदार दणका, केवळ तीन दिवसांतच रेटिंगमध्ये झाली मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:58 AM2020-05-19T11:58:28+5:302020-05-19T11:59:09+5:30

टिकटॉक लाइटही हे टीकटॉकचे दुसरे व्हर्जन देखील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपला देखील सुमारे 7 लाख युजर्सनी कमी  रेटिंग देत नापसंती दिली आहे.

youtube vs tiktok rating of short video making app tiktok is now 2 On play store here is the Reason-SRJ | TikTok ला भारतीयांचा जोरदार दणका, केवळ तीन दिवसांतच रेटिंगमध्ये झाली मोठी घसरण

TikTok ला भारतीयांचा जोरदार दणका, केवळ तीन दिवसांतच रेटिंगमध्ये झाली मोठी घसरण

googlenewsNext

नवी दिल्ली - शॉर्ट  व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच  TikTok ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. प्ले स्टोअरवर टिकटॉकचे यूजर्स रेटिंग अचानक कमी झाले आहे. आता सध्याची रेटींग  2 वर येवून पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी प्ले स्टोअरवर टिकटॉकचे रेटिंग 4.7 होते आणि ती थेट  2 वर घसरले आहे. खरं तर, बर्‍याच इंटरनेट युजर्सनी व्हर्च्युअल वॉरमध्ये सामिल होत टीकॉकवरच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यूट्यूब आणि टिकटॅाक यांच्यात कोण चांगले आहे यावरून  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. याचमाध्यमातून #tiktokBanIndia  हा हॅशटॅग आता जोरदार व्हायरल होत आहे. 2.42 कोटीहून अधिक  युजर्सने १ स्टार देत भारतात टीकटॉकवर बंदीची आणण्याची मागणी करत आहेत. 

आता गेल्या तीन दिवसांत टीकटॉकची भारतातील रेटींग ही 4.5 वरून २ वरून येवून पोहचली आहे. यापूर्वी इतका जबरदस्त धक्का टीकटॉकला मिळाला नसेल. केवळ तीन दिवसांत टीकटॉकची रेटींग जर इतकी कमी होवू शकते. तर टीकटॉक एप्लिकेशन डिलीट केले तर यापेक्षा जबर धक्का या चायनजीज अॅपला बसू शकतो. त्यामुळे हे तर आपल्या हातात आहे. जे शक्य आहे तोपर्यंत केवळ देसी वस्तूच वापरात आणायच्या आणि परदेशी वस्तूंंना ना- ना म्हणायचे. खरंतर कोरोनामुळे अनेकांनी आता चायनिज वस्तूंच्या वापरास नकार दिला आहे. 

लोकांच्या करमणूकीसाठी चायनीज कंपनीने हा अॅप बनवला. त्याचा सर्वात जास्त वापर हा भारतात झाल्याचे पाहायला मिळाले. नकळत याचचायना मोठा फायदा झाला. टीकटॉक केवळ करमणुकीचे माध्यम म्हणून बनवण्यात आलेल्या या अॅप्लिकेशनने चीनची रग्गड कमाई करून दिली आणि भारतीय मात्र टीकटॉक बनवण्यातच रममाण झाले.

याच अॅपचे अजून एक दुसरे व्हर्जन आहे. टिकटॉक लाइटही हे टीकटॉकचे दुसरे व्हर्जन देखील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपला देखील सुमारे 7 लाख युजर्सनी कमी  रेटिंग देत नापसंती दिली आहे.

Web Title: youtube vs tiktok rating of short video making app tiktok is now 2 On play store here is the Reason-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.