"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:32 IST2025-12-02T12:31:29+5:302025-12-02T12:32:35+5:30
भाजपा खासदार जगदीश शेट्टार यांना एक अनोखा फोन आला ज्यामुळे ते हैराण झाले आहेत.

"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपा खासदार जगदीश शेट्टार यांना एक अनोखा फोन आला ज्यामुळे ते हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे कॉल करणाऱ्या व्यक्तीने कोणतीही तक्रार केली नाही, तर थेट नवीन आयफोन मागितला आहे. प्रतीक मालाजी असं कॉल करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या फोनची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
मदतीच्या नावाने तरुणाने हा फोन केला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने निरागसपणे खासदार जगदीश शेट्टार यांना म्हटलं की, "सर, मला तुमच्याकडून थोडी मदत हवी आहे." यावर शेट्टार यांनी "तुम्हाला काय मदत हवी आहे?" असं विचारलं.
तरुणाने यावर उत्तर दिलं. "सर, iPhone 17 Pro Max लाँच झाला आहे. तो मला हवा आहे, सर!" असं सांगितलं. हे ऐकताच जगदीश शेट्टार स्तब्ध झाले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हणाले, "लोक खासदारांना अशा गोष्टी मागण्यासाठी फोन करतात?" त्यानंतर त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला.
लोकांना हा किस्सा मजेदार वाटत आहे, तर काही जण प्रश्न विचारत आहेत की लोक आता लोकप्रतिनिधींकडून फोनची मागणी का करत आहेत? या संपूर्ण संभाषणाचा ऑडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.