1 मे पासून जनगणनेला सुरुवात होणार, 'हे' प्रश्न विचारले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:10 PM2020-01-10T12:10:46+5:302020-01-10T12:22:47+5:30

देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते.

you need to know questions related to census 2021 | 1 मे पासून जनगणनेला सुरुवात होणार, 'हे' प्रश्न विचारले जाणार

1 मे पासून जनगणनेला सुरुवात होणार, 'हे' प्रश्न विचारले जाणार

Next
ठळक मुद्देदेशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते.देशाची 16 वी जनगणना 2021 मध्ये होणार आहे. 1 मे पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली -  देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते. सरकारचे आर्थिक धोरण, विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन यांच्या दृष्टीने जनगणना महत्त्वपूर्ण ठरते. दरम्यान आपल्या देशाची 16 वी जनगणना 2021 मध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाइल अ‍ॅपवरून होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याची याआधी माहिती दिली आहे. 

जनगणना देशाच्या भविष्यातील विकासाच्या योजना बनवण्यासाठी आधार ठरत असते. त्यामुळे जनगणनेमध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 1865 नंतर देशात आतापर्यंत 16 वी जनगणना होणार आहे. आतापर्यंत जनगणनेच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी मोबाइल अ‍ॅपचा वापर होणार आहे. यामध्ये सर्व आकडेवारी डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहे. जेवढ्या सुक्ष्म पद्धतीने जनगणना होईल. तेवढीच देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मदत मिळणार असल्याचं अमित शहा यांना म्हटलं होतं. 1 मे पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. सरकारने जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या काही संभाव्य प्रश्नांची अधिसुचनाही प्रसिद्ध केली आहे.


 

जनगणनेदरम्यान 'हे' प्रश्न विचारले जाणार

1. इमारत क्रमांक (पालिका किंवा स्थानिक अधिकृत क्रमांक) काय?

2. घर क्रमांक काय?

3. घराचे बांधकाम करताना छत, भिंती आणि सिलिंगमध्ये मुख्यत्वे वापरण्यात आलेले साहित्य कोणते?

4. घराचे बांधकाम कोणत्या कारणासाठी होत आहे?

5. घराची स्थिती काय?

6. घराचा क्रमांक किती?

7. घरात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या किती?

8. कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?

9. कुटुंबप्रमुख स्त्री आहे की पुरुष?

10. कुटुंबप्रमुख अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती किंवा इतर समाजातील आहेत का?

11. घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे?

12. घरातील खोल्यांची एकूण संख्या किती?

13. घरात किती लग्न झालेली जोडपी राहतात?

14. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत काय आहे?

15. घरात पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता काय?

16. विजेचा मुख्य स्त्रोत काय?

17. शौचालय आहे कि नाही?

18. कोणत्या प्रकारचे शौचालय आहे?

19. ड्रेनेजची व्यवस्था आहे का?

20. घरात वॉशरुम आहे की नाही?

21. स्वयंपाक घर आहे की नाही, त्यात एलपीजी किंवा पीएनजीची जोडणी आहे किंवा नाही?

22. स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन कोणते?

23. घरात रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आहे का?

24. टेलिव्हिजन सेट आहे का?

25. इंटरनेटची सुविधा आहे की नाही?

26. लॅपटॉप किंवा संगणक आहे की नाही?

27. टेलिफोन किंवा मोबाईल किंवा स्मार्टफोन आहे का?

28. सायकल किंवा स्कूटर किंवा मोटरसायकल किंवा मोपेड आहे का?

29. कार किंवा जीप किंवा व्हॅन आहे का?

30. घरात मुख्यत्वे कोणत्या धान्याचा खाण्यासाठी वापर केला जातो?

31 मोबाईल क्रमांक (जनगणनेसंबंधी संपर्कासाठी)

महत्त्वाच्या बातम्या 

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार 15 हजार; आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना

बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

हिंसाचार थांबला की मगच ‘सीएए’वर सुनावणी घेऊ; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

 

Web Title: you need to know questions related to census 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत