कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:41 AM2020-09-28T06:41:56+5:302020-09-28T06:42:35+5:30

गुजरातमध्ये घातली बंदी

This year's Navratri festival without pride due to corona! | कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच !

कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच !

googlenewsNext

अहमदाबाद : कोरोना साथीमुळे यंदाच्या वर्षी नवरात्रौत्सवात गुजरातमध्ये गरब्याच्या आयोजनास संमती न देण्याचा निर्णय मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या सरकारने घेतला. या संसर्गाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात येत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. पण यंदा गुजरातमध्ये गरबा खेळला जाणार नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. १७ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अहमदाबाद येथे राज्यस्तरीय गरबा महोत्सव सुरू केला होता. यंदा तो ही होऊ शकणार नाही.

अंबाबाई मंदिरातच सर्व धार्मिक विधी होणार
कोल्हापूर : कोरोनामुळे यंदा राज्यात दहीहंडी तसेच गणेशोत्सवही साजरे करता आले नाहीत. धार्मिक स्थळे सुरु करणे व धार्मिक कार्यक्रमांना एकत्र येण्यावर अजूनही निर्बंध कायम असल्याने यंदा राज्यात नवरात्रौत्सवात गरब्याचे आयोजन करता येणार नाही. करवीरनिवासिनी
श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त सर्व धार्मिक विधी दरवर्षीप्रमाणेच होतील परंतु ते अंतर्गतच असतील. शासननिर्णय झाला तरच मंदिरात प्रवेश व दर्शन सुरू केले जाणार आहे, अन्यथा नाही, असे असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्पष्ट केले.

तुळजापुरातील उत्सवाबाबत साशंकता
उस्मानाबाद : सध्या उस्मानाबाद जिल्ह्यासोबतच तुळजापुरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे़ त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवाबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे़ मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, आपण शासनाला या अनुषंगाने प्रस्ताव पाठविला आहे़ सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही केली जाईल.

Web Title: This year's Navratri festival without pride due to corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.